शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

सांगलीत युवक राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा; बेरोजगारीच्या प्रश्नावर शासनाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 19:22 IST

रोजगार निर्मितीचे आश्वासन तरुणांना देऊन त्यांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

सांगली : रोजगार निर्मितीचे आश्वासन तरुणांना देऊन त्यांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या विरोधात निषेधाच्या जोरदार घोषणाही यावेळी देण्यात आल्या.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील आणि जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विश्रामबाग येथील पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. निषेधाच्या जोरदार घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. याठिकाणीही निदर्शने करण्यात आली. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना कोते-पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात देशभरातील तरुणांना खोटी आश्वासने दिली. २ कोटी रोजगार निर्मितीचे फसवे स्वप्न त्यांनी दाखविल्यामुळे युवक त्यांच्या प्रचाराला भुलले. सरकार सत्तेवर आल्यानंतर रोजगार निर्मिती करण्याऐवजी वेगवेगळ्या चुकीच्या धोरणांच्या माध्यमातून उपलब्ध असलेला रोजगारही हिरावून घेण्याचे काम सरकारने केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास योजना सुरू केली, मात्र ही योजनासुद्धा फसली. राज्यात या योजनेच्या ७ हजार २५२ प्रशिक्षण संस्थांना सरकारने पैसा दिला नाही. त्यामुळे अशा संस्था बंद पडल्या. त्याठिकाणी काम करणारे युवक बेरोजगार झाले. शासनाच्या प्रत्येक योजना फसत आहेत. त्यामुळे या धोरणांचा निषेध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे. भरत देशमुख म्हणाले की, गेल्या चार वर्षात भाजप सरकारने केवळ भुलभुलय्या दाखविला आहे. रोजगाराचा प्रश्न महाराष्ट्रात गंभीर बनला आहे.उच्चशिक्षित तरुणांनाही बेरोजगार म्हणून भटकावे लागत आहे. तरुणांच्यादृष्टीने तर सर्वात वाईट काळ आला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढेही टप्प्या-टप्प्याने आम्ही युवकांचे प्रश्न मांडतच राहू, असे ते म्हणाले. आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, ताजुद्दीन तांबोळी, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, शरद लाड, राहुल पवार, आदिल फरास, स्वप्नील जाधव, गणेश पाटील, खंडू पवार, कविता घाडगे, मनोज भिसे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Sangliसांगली