शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भावाची ‘ईडी’कडून चौकशी, राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 13:47 IST

राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पुन्हा तर्कवितर्कांना उधाण

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे थोरले बंधू भगतसिंह पाटील यांना ईडीने नोटीस पाठवून त्यांची चौकशीही केली. चार दिवसांपासून सुरू असलेल्या या हालचालींबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. रविवारी जयंत पाटील यांनीच याबाबतची स्पष्टता केली. त्यामुळे राज्याच्या व जिल्ह्याच्या राजकीय पटलावर पुन्हा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.जयंत पाटील यांच्या भाजप व अजित पवार गटातील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळत असतानाच ईडीच्या नोटिसीमुळे पुन्हा तर्कवितर्क सुरू झाले आहेत. जयंत पाटील यांनाही काही दिवसांपूर्वी ईडीने नोटीस बजावून चौकशी केली होती. आयएलएफएस या कंपनीशी त्यांचा संबंध असल्याचा ठपका ईडीने ठेवला होता. त्यामुळे त्यांना चौकशीस सामोरे जावे लागले. इस्लामपूर येथील त्यांच्याशी संबंधित एका संस्थेची व सांगलीतील दोन व्यापाऱ्यांचीही ईडीने चौकशी केली होती. हे प्रकरण शांत झाल्यानंतर आता जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयांना नोटिसा बजावल्या जात आहेत.भगतसिंह पाटील हे मुंबईतील हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही माहिती ईडीने मागविली होती. त्यांना चौकशीलाही बोलावण्यात आले होते. जयंत पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, चार दिवसांपूर्वी माझ्या भावाला नोटीस आली होती. ईडीला ज्या गोष्टींची माहिती हवी होती, ती देण्यात आली आहे. या कारवाईचा व अन्य राजकीय घडामोडींचा काही संबंध नाही. शरद पवार व अजित पवार यांच्या भेटीशी त्याचा संबंध नाही.

जयंत पाटील पुन्हा चर्चेतभगतसिंह पाटील यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे जयंत पाटील पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या आणखी काही निकटवर्तीयांना ईडीने नोटीस बजावल्याचीही चर्चा होती. मात्र, नेमक्या किती जणांना व कोणाकोणाला नोटीस बजावली आहे, याची माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :SangliसांगलीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJayant Patilजयंत पाटील