शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत काँग्रेसची एकी अन् राष्ट्रवादीत बेकी; लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील, सुमन पाटील यांच्या वेगळ्या वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 17:49 IST

''कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा''

दत्ता पाटीलतासगाव : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नव्याची उमेदवारी मिळाली नाही. हीच गोष्ट काँग्रेसच्या पथ्यावर पडली. पडद्याआड का असेना, पण काँग्रेसचे सर्व शिलेदार एकवटले. याउलट चित्र राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाच्या नेत्यांच्यात पाहायला मिळाले. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ''मविआ''चा अजेंडा राबवला, तर आमदार सुमन पाटील यांनी पडद्याआडून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे काम केले. त्यामुळे काँग्रेसची एकी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असले, या निमित्ताने राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाच्या नेत्यांच्यात मात्र विसंगती पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीला सांगली जिल्ह्यात काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही. त्याचे सहानुभूतीत रूपांतर करून विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यांना काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी पडद्याआडून रसत पुरवल्याच्या चर्चा आता उघडकीस येत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील काँग्रेसचे सगळे नेते एकसंध झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या उलट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जिल्ह्यातील चारही आमदारांनी शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार सुमन पाटील हे एकाच पक्षात राहिले. त्यामुळे जिल्ह्यातील शरद पवार गट एकसंघपणे काम करताना गेल्या काही काळात दिसून आला. पक्ष फुटीपूर्वी आमदार सुमन पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्यात मतभेद झाल्याचे पाहायला मिळत होते. किंबहुना जयंत पाटील यांना मानणारा तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील वेगळा गट कार्यरत होता. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही गटबाजी नाहीशी झाली होती.आमदार जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी ताकद उभा केली होती. मात्र याचवेळी आमदार सुमन पाटील यांच्या गटाने पडद्याआडून एकसंधपणे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना रसद दिली. त्यामुळे आमदार जयंत पाटील आणि आमदार सुमन पाटील यांच्यातील विसंगती या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. येणाऱ्या काळात काँग्रेस एकसंध झाली असली तरी, राष्ट्रवादीचे अंतर्गत राजकारण कोणत्या नव्या वळणावर जाईल, याचे कुतूहल निर्माण झाले आहे.

दिलदार शत्रुत्व चर्चेतखासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत बोलताना ''कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा'' असा उल्लेख केला होता. हा उल्लेख करत असताना, त्यांचा रोख जयंत पाटील यांच्याकडेच असल्याची चर्चा होती. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात जयंत पाटील यांचे समर्थक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांसह सगरे गटाची भूमिका चर्चेचा विषय ठरली होती. त्याच अनुषंगाने खासदार पाटील यांच्या दिलदार शत्रुत्वाची चर्चा मतदारसंघात होताना दिसून येत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलsanjaykaka patilसंजयकाका पाटीलsumantai patilसुमनताई पाटील