शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात ‘रोहित’ पर्व; आबांचा बालेकिल्ला भक्कम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 17:45 IST

माजी राज्यमंत्री घोरपडेंची साथ मिळूनही संजयकाकांचा धक्कादायक पराभव

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांनी उच्चांकी मताधिक्याने विजय मिळवला. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी साथ देऊनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार संजयकाका पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. या विजयाने तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ आर. आर. पाटील यांचा बालेकिल्ला भक्कम असल्याचे स्पष्ट झाले. या विजयाने तासगाव कवठेमहांकाळला रोहित पर्वाची सुरुवात झाली आहे. विजयानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित असतानाच ऐनवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपमधून प्रवेश केलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. त्याचवेळी त्यांना माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे अंजनी विरुद्ध चिंचणी अशी पारंपरिक लढत उभा राहिली. एकीकडे रोहित पाटील तर दुसरीकडे संजयकाका पाटील यांना अजितराव घोरपडे यांची साथ होती. त्यामुळे मतदारसंघात काट्याची टक्कर होत असल्याचे दिसून आले.आर. आर. पाटील यांच्या पश्चात त्यांचे पूत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे या निवडणुकीकडे राज्यभराचे लक्ष लागून राहिले होते. रोहित पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली होती. तर संजय पाटील यांच्यासाठी अजित पवार यांनी सभा घेतली होती. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा संघर्ष या निवडणुकीत पाहायला मिळाला. ही निवडणूक अत्यंत काठावर आहे, असे समजले जात असतानाच निकालानंतर मात्र नवख्या रोहित पाटील यांनी राजकारणातील मातब्बर असणाऱ्या अनुभवी संजयकाका यांना धोबीपछाड दिल्याचे दिसून आले.शनिवारी सकाळी तासगाव येथे प्रशासकीय इमारतीत मतमोजणीला सुरुवात झाली. टपाली मतदानातच रोहित पाटील यांनी आघाडी घेतली. त्यानंतर फेरीनिहाय मतमोजणीला सुरुवात झाली. प्रत्येक फेरीत रोहित पाटील यांचे मताधिक्य वाढत गेले. एकूण २२ फेऱ्यांपैकी संजय पाटील यांचे गाव असलेल्या चिंचणी गावाचा समावेश असलेली एक फेरी आणि अजितराव घोरपडे यांचे गाव असलेल्या कोंगनोळीचा समावेश असलेल्या एक फेरीतच संजय पाटील यांना काही प्रमाणात मताधिक्य मिळाले.

प्रत्येक फेरीत रोहित पाटील आघाडीवरकोंगनोळी वगळता उर्वरित सर्व फेऱ्यात रोहित पाटील आघाडीवर राहिले. प्रत्येक फेरीत रोहित पाटील यांचे मताधिक्य वाढत जाऊन रोहित पाटील यांचा दणदणीत मतांनी विजयी झाला. तर दुसरीकडे लोकसभेपाठोपाठच माजी खासदार संजय पाटील यांना विधानसभा निवडणुकीत देखील दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

जनतेचा कौल मान्यविधानसभा निवडणुकीत विकासाचे राजकारण सोडून निवडणूक भावनिक मुद्द्यावर गेली. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. केंद्रात व राज्यात आपले महायुतीचे सरकार आहे. आपण पुन्हा विकासाच्या मार्गाने राजकारण करून लोकांच्या जनमताचा आदर करूया. कोणताही अनुचित प्रकार आपल्याकडून घडू नये याची काळजी घ्या, अशी प्रतिक्रिया माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.९५ गावात आघाडीरोहित पाटील यांना तासगाव तालुक्यातील ४५, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील ५० अशा एकूण ९५ गावांतून आघाडी मिळाली, तर संजय पाटील यांना तासगाव तालुक्यातून तीन आणि कवठेमहांकाळ तालुक्यातून ११ अशी १४ गावांतून आघाडी मिळाली.

शहरांची रोहित पाटील यांना साथमतदारसंघातील तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन्ही शहरांनी रोहित पाटील यांना साथ दिल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी तासगाव शहरातून आर. आर. पाटील यांना देखील मताधिक्य मिळाले नव्हते. मात्र, यावेळी रोहित पाटील यांना तासगाव शहराने लक्षवेधी मताधिक्य दिले. तासगाव शहरातून रोहित पाटील यांना २५२२ इतके मताधिक्य मिळाले, तर कवठेमहांकाळ शहरातून देखील २४१६ इतके मताधिक्य मिळाले.

एकूण मिळालेली मते

  • रोहित पाटील : एकूण १ लाख २८ हजार ४०३
  • संजय पाटील : १ लाख ७५९
  • रोहित पाटील यांचे एकूण मताधिक्य : २७ हजार ६४४
टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024tasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारRohit Patilरोहित पाटिलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024