शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

"जास्त फिजिकल डिस्टन्सिंग अजितदादाच पाळतात; त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 08:17 IST

पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवरून भाजपने टीकेची झोड उठविली आहे.

सांगली : राज्यातील महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली तर राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रित निवडणुकीला सामोरे जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत स्पष्ट केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्याबाबत विचारता पाटील म्हणाले की, राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्रित सामोरे जातील. त्यातूनही काँग्रेस स्वबळावर अडली तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढतील.

नियम पाळण्यात अजितदादा आघाडीवर

पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवरून भाजपने टीकेची झोड उठविली आहे. त्याबाबत जयंत पाटील म्हणाले, नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलावले होते. अजितदादा येणार म्हणून लोकांनी मोठी गर्दी केली. भाषणात त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. त्यांना गर्दी अपेक्षित नव्हती. सर्वांत जास्त फिजिकल डिस्टन्सिंग अजितदादाच पाळतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस