शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

राज्य सरकारला सत्तेची मस्ती, अजित पवारांची सडकून टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 18:50 IST

कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले. हे सर्व :५० खोके सरकार ओके'  अशा पध्दतीने

दत्ता पाटीलतासगाव : राज्य सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. पक्षांतर बंदी कायद्यालाही तिलांजली दिली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आल्याचे पवार म्हणाले. आरवडे(ता. तासगाव) येथे ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याहस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, युवा नेते रोहित पाटील उपस्थित होते.यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, " आम्ही आर. आर. पाटील अनेक वर्षे सत्तेमध्ये होतो, पण आम्ही असं कधी चुकीचे वागलो नाही. राज्यातील सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. पक्षांतर बंदी कायदाला तिलांजली दिली आहे, कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले. हे सर्व :५० खोके सरकार ओके'  अशा पध्दतीने सुरू आहे. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात येत आहे.सरकारचं कारभार बेताल  सुरू आहे. छत्रपतींच्याबद्दल बेताल बोलतात. आम्ही कसं खपवून घ्यायचे? शाहू, फुले आणि कर्मवीर यांच्याबद्दलही बोलतात. सरकारचे आमदार, मंत्री देखील बोलत आहेत.त्यांना लाज, लज्जा शरम आहे का नाही? छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक संबोधून मी काही चुकीचं बोललो नाही, पण ज्यांनी महापुरुषांच्या अवमान केला त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांकडून टुकारपणा चालू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला.ते पुढे म्हणाले, "राज्याच्या मंत्री मंडळात एक पण महिला नाही, तुमच्या पोटात दुखतं का? महिलांना का घेत नाही? विस्तार पण करत नाही. राज्यात अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे." मंत्रिमंडळ पण वाढवत नाही, सगळ्यांना मंत्री करतो म्हणून गाजर दाखवले.  सत्ताधाऱ्यांना  मंत्रिमंडळ विस्तार करण्याची भीती वाटत आहे का? अशी विचारणा त्यांनी केली.केंद्राच्या साखर निर्यात धोरणावर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी यावेळी सडकून टीका केली. केवळ कोटा पद्धत धोरण घेऊन उत्तर प्रदेशचा फायदा केला. आम्ही ओरडून सांगतोय, पण कोणी ऐकत नाही. महाराष्ट्रात प्रचंड साखर शिल्लक असून निर्यातीचा कोटा वाढवला, तर राज्याच्या शेतकऱ्यांना 600 रूपये अधिकचा दर मिळेल, पण आमच्या शेतकऱ्यांच्या हातात देवळातील घंटा देण्यात येत असल्याची टीका केली.आर. आर. आबांच्या आठवणींना उजाळा  यावेळी अजित पवार यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. आर. आर. पाटील यांच्याबरोबर काम करताना ते नेहमी या भागाची काळजी करत असत. तसेच या भागातला पाणी मिळाले पाहिजे यासाठी ते आग्रही असायचे. त्यांच्या आग्रहामुळे आम्ही विविध खात्यात काम करत असताना मोठ्या प्रमाणात निधी पाणी योजनांना दिला. आर. आर. पाटलांनी ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान यासारखे अभियान सुरू केले अशा शब्दांत आबांच्या आठवणीना उजाळा दिला.

टॅग्स :SangliसांगलीAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस