वाळवा तालुक्यातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा राष्ट्रवादीकडून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:27 IST2021-05-07T04:27:37+5:302021-05-07T04:27:37+5:30
वाळवा तालुक्यातील आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आशा सेविका व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना युवा नेते प्रतीक पाटील यांच्यामार्फत सन्मानपत्र, मास्क, सॅनिटायझर वाटप ...

वाळवा तालुक्यातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा राष्ट्रवादीकडून सन्मान
वाळवा तालुक्यातील आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आशा सेविका व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना युवा नेते प्रतीक पाटील यांच्यामार्फत सन्मानपत्र, मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर, आष्टा तसेच वाळवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुमारे ७५० डॉक्टर, आशासेविका व कर्मचाऱ्यांना युवा नेते प्रतीक पाटील यांच्याकडून सन्मान पत्र, मास्क व सॅनिटायझर वितरण करण्यात आले. कोरोनाच्या संकटकाळात गेल्या दोन वर्षांपासून आपण समाजाची जी निस्सीम सेवा करीत आहात, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, अशी भावना सन्मान पत्रात मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या-त्या गावात हे वाटप केले. जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या संघटकांनी याकामी परिश्रम घेतले.
आपली ही समाजाची निस्सीम सेवा मोठी देशसेवा आहे. त्याबद्दल तुमचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो. तुम्ही समाजाच्या आरोग्याची काळजी घेता आहात. त्याचबरोबर स्वत:च्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजीही घ्या. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, अशा आशयाचे सन्मान पत्र प्रतीक पाटील यांनी सर्वांना दिले आहे. इस्लामपूर, आष्टा येथील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच बागणी, वाळवा, बोरगाव, पेठ, नेर्ले, कामेरी, येलूर, कुरळप, येडेमच्छिंद्र, कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे वाटप करण्यात आले.
प्रा. शामराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शहाजी पाटील, विश्वनाथ डांगे, आष्ट्याचे झुंजारराव पाटील, दिलीपराव वग्याणी, विराज शिंदे, संग्राम फडतरे, माणिक शेळके, माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, उपसभापती नेताजीबाबा पाटील, संचालक कार्तिक पाटील, संचालक दिलीपराव पाटील, युवराज सूर्यवंशी, बँकेचे संचालक विजय यादव, सरपंच वैभव रकटे, नेर्ल्याचे संभाजी पाटील, अतुल पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकाऱ्यांनी हे वाटप केले. जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे तसेच गावोगावच्या संघटकांनी हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले.