शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: इस्लामपूरमध्ये सलग आठव्यांदा जयंतराज, निशिकांत पाटील यांची जोरदार टक्कर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 17:33 IST

१३ हजार २७ मतांनी विजयी : इस्लामपूर शहर-ग्रामीणने तारले तर आष्ट्यात निराशा

युनूस शेख

इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सलग आठव्या विजयाची नोंद केली. मात्र यावेळी त्यांना अवघ्या १३ हजार २७ इतक्या मताधिक्यावर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी अत्यंत चिवट झुंज देताना जयंतरावांच्या बालेकिल्ल्यावर धडक मारू शकतो, असा संदेशही दिल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत इतर १० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.आमदार जयंत पाटील यांच्या मुत्सद्देगिरीसमोर अनेक विरोधकांचे पानिपत झाले असताना निशिकांत पाटील यांनी दुसऱ्यावेळी अत्यंत ताकदीने त्यांच्याविरोधात उभे राहून एकच खळबळ उडवून दिली होती. एकतर्फी वाटणारी निवडणूक निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे चुरशीची रंगली. ५० हजारांपासून पुढे ८५ हजारांपर्यंत मताधिक्य घेण्याचा जयंत पाटील यांचा पायंडा यावेळी निशिकांत पाटील यांनी मोडीत काढला. त्यामुळे जयंत पाटील यांना तब्बल २१ फेऱ्यांच्या मोजणीनंतर १३ हजार २७ इतक्या मताधिक्यापर्यंत विजयासाठी खाली आणण्यात निशिकांत पाटील यशस्वी ठरले.तालुक्यात जयंत पाटील यांच्याकडे संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांचे प्रचंड मोठे जाळे आहे. त्या तुलनेत निशिकांत पाटील यांच्याकडे तोकडी ताकद होती. मात्र त्यांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेत प्रचाराचा धुरळा उडवून दिला. जयंत पाटील यांच्याविरोधी जाहीर सभांमधून आरोप करतानाच सोशल मीडियावरही निशिकांत पाटील यांनी आक्रमक प्रचार यंत्रणा राबवली होती.जयंत पाटील यांच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीचा पंचनामा करताना निशिकांत पाटील यांनी ऊसदर, मतदारसंघातील विकास कामे, बेरोजगारी, समाजासाठी गरजेचा असणारा मूलभूत विकास, पाणंद रस्ते अशा अनेक विषयांवरून नॅरेटीव्ह तयार करत जयंत पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र जयंत पाटील यांनी आरोपांवर बोलण्याचे टाळत राज्यसरकारच्या कारभारावर, भ्रष्टाचारावर आणि योजनांवर आरोपाच्या फैरी झाडत राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असल्याचे सांगत मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.आ. जयंत पाटील यांनी तालुक्यातील विरोधकांची ताकद नेहमीच दुबळी राहील, अशा पद्धतीने आपल्या राजकारणाची वाटचाल ठेवली होती. प्रत्येक निवडणुकीत मतविभाजन होईल याची खबरदारी ते नेहमीच घेत होते. मात्र यावेळी पहिल्यांदाच त्यांनी असा कोणताही प्रयत्न न करता विरोधकांची ताकद जोखण्याचा डाव खेळला. त्यांच्या या खेळीमुळे इस्लामपूर मतदारसंघातील खरे राजकीय वास्तव समोर आले.

पराभूत उमेदवार

  • निशिकांत भोसले-पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट) - ९६,८५२
  • अमोल कांबळे (बसपा) - ७०४
  • राजेश गायगवाने (वंचित आघाडी) - ९९४
  • सतीश इदाते (रासप) - १९४
  • नोटा - १०४२

जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार) - १०९८७९विजयाची तीन कारणे

  • संस्था आणि संघटनेतून कामगार व कार्यकर्त्यांची मोठी ताकद
  • विरोधकांच्या आरोपांना बेदखल करत राज्य सरकारवर टीकेची झोड
  • नियोजनबद्ध प्रचार आणि साम, दाम, दंड, भेदाची नीती.

निशिकांत पाटील यांच्या पराभवाची कारणे

  • विरोधकांची मोट बांधली; मात्र कामी आली नाही.
  • प्रचाराचे रान उठवण्यात यश मात्र मतांची बेरीज चुकली.
  • शेवटच्या दोन दिवसांत यंत्रणेत आलेला विस्कळीतपणा.

जयंतरावांच्या चिरेबंदी वाड्याला धक्केइस्लामपूर विधानसभेच्या अटीतटीने झालेल्या निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच विरोधी उमेदवाराने मोठी टक्कर दिल्याचे स्पष्ट झाले. आमदार जयंत पाटील यांच्या विजयामध्ये इस्लामपूर शहराने सात हजारांहून अधिक मतांचे आधिक्य दिले. कृष्णा नदीकाठच्या काही गावांतून निसटते मताधिक्य मिळाले. मात्र ज्या आष्टा शहरावर त्यांची भिस्त होती, त्या शहराने मात्र निराशा केली. मिरज तालुक्यातील आठ गावांमध्येही निशिकांत पाटील यांनी आघाडी घेतली. त्यामुळे जयंतरावांचा चिरेबंदी वाड्याला पहिल्यांदाच धक्के बसल्याचे चित्र समोर आले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024islampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024