शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला किती जागा द्यायच्या नरेंद्र मोदी, अमित शहा ठरवतील - राजेश क्षीरसागर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:15 IST

शिल्लक शिवसेनेबद्दल बोलण्यासारखे काही उरलेले नाही

सांगली : कोणाच्या काहीतरी बोलण्याने शिवसेनेच्या जागा कमी होणार नाहीत. आमच्या जागांचा फैसला पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती आहे, असे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले की, शिवसेना व भाजपमध्ये आता कोणताही वाद नाही. राज्यात कोणीतरी काहीतरी बोलत असते. त्यामुळे कोणाच्या मतावर विधानसभेचे जागावाटप होणार नाही. मोदी व शहा हेच जागावाटपाचे सूत्र ठरवतील.सध्या शिवसेना व भाजपमध्ये चांगला समन्वय आहे. पूर्वीच्या युतीत हा समन्वय कधीच दिसला नव्हता. त्यामुळे आता गतीने कामे होत आहेत. लाेकाभिमुख निर्णय हाेत आहेत. लाेकांनाही सरकार आपले वाटत आहे. सांगली जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघातील पक्षबांधणीची जबाबदारी माझ्याकडे आहे. या ठिकाणी पक्षाचे काम चांगले आहे. जिल्ह्यातील बाजार समित्या, महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमची शिवसेना ताकदीने उतरेल.

काही संस्थांवर शिवसेनेचा झेंडा फडकेल, यासाठी प्रयत्न राहील. जिल्हा नियोजन समितीमध्ये रिक्त पदांबाबत लवकरच निर्णय होईल. निधी वाटपात आम्ही कधीही राजकारण करणार नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसवाल्यांना पैसा व पद महत्त्वाचे वाटते. त्यामुळे सतत ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत असतात. नियोजन समितीच्या निधी वाटपात राजकारण होत असल्याची त्यांची टीका अयोग्य आहे.पूर्वीचे संपर्कप्रमुख कळलावेयापूर्वीच्या शिवसेनेत कुणीतरी बाहेरचा संपर्कप्रमुख यायचा व नुसती भांडणे लावायचा. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी हा कार्यक्रम केला, अशी टीका करीत क्षीरसागर यांनी नितीन बानुगडे-पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.विमानतळासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणारकवलापूर (ता. मिरज) येथे विमानतळ उभारण्याच्या प्रश्नावर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत, असे क्षीरसागर यांनी सांगितले.सीमा प्रश्न लवकरच सुटणारमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकार समितीच्या बैठका होत आहेत. मी त्या समितीत आहे. नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घातल्याने लवकरच प्रश्न सुटेल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.ती तर शिल्लक शिवसेनासंजय राऊत यांनी ठाकरेंकडील शिवसेना संपवली आहे. आता शिल्लक शिवसेनेबद्दल बोलण्यासारखे काही उरलेले नाही, असे क्षीरसागर म्हणाले. 

टॅग्स :SangliसांगलीRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर