नानासाहेब शिंदे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST2021-06-21T04:19:30+5:302021-06-21T04:19:30+5:30

फोटो- सांगली येथे शिवभवानी उद्योगसमूहाच्या वतीने शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते नानासाहेब शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. दुधोंडी : शिवसेना ...

Nanasaheb Shinde felicitated | नानासाहेब शिंदे यांचा सत्कार

नानासाहेब शिंदे यांचा सत्कार

फोटो- सांगली येथे शिवभवानी उद्योगसमूहाच्या वतीने शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते नानासाहेब शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

दुधोंडी : शिवसेना हा सर्वसामान्यांना न्याय देणारा, कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे. त्यामुळेच शिवसेनाही तळागाळापर्यंत पोहोचली आहे, असे प्रतिपादन शिवभवानी उद्योगसमूहाचे संस्थापक शिवाजीराजे जाधव यांनी केले.

गुलमोहर फाउंडेशनचे अध्यक्ष नानासाहेब शिंदे यांची शिवसेना सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगली येथील ठाणेदार क्लिनिक हॉलमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

शिवाजीराजे जाधव म्हणाले की, नानासाहेब शिंदे हे गेल्या दहा वर्षांपासून गुलमोहर फाउंंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत आहेत. यामुळेच पक्षाने त्यांची दखल घेऊन त्यांना न्याय दिला.

यावेळी बजरंग पाटील, डॉ. किशोर ठाणेकर, रूपेश मोकाशी, नितीन काळे, प्रसाद रिसवडे आदी उपस्थित होते.

Web Title: Nanasaheb Shinde felicitated