मिरज जंक्शन रेल्वे स्थानकाचे अज्ञातांकडून नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:02+5:302021-01-08T05:29:02+5:30

कर्नाटक सीमेवरील मध्य रेल्वेचे मिरज हे महत्त्वाचे स्थानक आहे. मिरज स्थानकाचे महात्मा बसवेश्वर असे नामकरण करण्याची मागणी सुरू आहे. ...

Naming of Miraj Junction railway station by unknown persons | मिरज जंक्शन रेल्वे स्थानकाचे अज्ञातांकडून नामकरण

मिरज जंक्शन रेल्वे स्थानकाचे अज्ञातांकडून नामकरण

कर्नाटक सीमेवरील मध्य रेल्वेचे मिरज हे महत्त्वाचे स्थानक आहे. मिरज स्थानकाचे महात्मा बसवेश्वर असे नामकरण करण्याची मागणी सुरू आहे. विविध समाज, पक्ष, संघटनांकडून स्थानकाच्या नामकरणाच्या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेतलेली नाही. बुधवारी मध्यरात्री तीन वाजता काही अज्ञातांनी स्थानकाच्या मुख्य इमारतीवर चढून मिरज जंक्शन या फलकावर साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे रेल्वे जंक्शन मिरज असा फलक लावला. स्थानकात तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने संबंधितांनी स्थानकातून पलायन केले. रेल्वे सुरक्षा दलाने तत्काळ हा फलक हटविला.

विविध पक्ष संघटना मिरज जंक्शनच्या नामकरणाची मागणी करीत आहेत. या प्रकारामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल २२ रोजी पुणे-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या पाहणीसाठी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने सुरक्षा दलाने स्थानकात बंदोबस्त वाढविला आहे. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फाेटाे : ०६ मिरज २

Web Title: Naming of Miraj Junction railway station by unknown persons