इस्लामपूरच्या खुल्या नाट्यगृहास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या
By Admin | Updated: January 3, 2015 00:11 IST2015-01-02T23:25:35+5:302015-01-03T00:11:19+5:30
महाडिक युवा शक्तीची मागणी : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

इस्लामपूरच्या खुल्या नाट्यगृहास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेने आदर्श बालक मंदिराशेजारी बांधलेल्या खुल्या नाट्यगृहाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज खुले नाट्यगृह’ असे नामकरण करावे, अशी मागणी वनश्री युथ फौंडेशन संचलित महाडिक युवा शक्तीच्यावतीने करण्यात आली.
नगरसेवक कपिल ओसवाल व युवा शक्तीचे अध्यक्ष सोमनाथ फल्ले यांनी शिष्टमंडळासह जाऊन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांना या मागणीचे निवेदन दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचे आचारविचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. अशा या थोर महापुरुषाच्या नावाने इस्लामपूर शहरात वास्तू असणे, ही सर्वांच्यादृष्टीने अभिमानाची बाब ठरेल, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी विशाल शिंदे, सुजित थोरात, संदीप माने, चेतन शिंदे, जलाल मुल्ला, वैभव पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)