शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नालसाब मुल्ला खूनप्रकरण: गोळीबारासाठी मध्य प्रदेश बनावटीचे पिस्तूल, संशयितांना पाच दिवस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 16:15 IST

रात्रीच्या सुमारास घरासमोर थांबला असता नालसाब मुल्लावर गोळ्या झाडल्या

सांगली : राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मौलाअली मुल्ला (रा.गुलाब कॉलनी, सांगली) याच्या खुनातील पिस्तूल, कोयता व दोन दुचाकी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केली. मध्य प्रदेश बनावटीच्या पिस्तुलाचा गोळीबारासाठी वापर झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांना पाच दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.सनी सुनील कुरणे (वय २३, रा.जयसिंगपूर), विशाल सुरेश कोळपे (२०, रा.लिंबेवाडी ता.कवठेमहांकाळ), स्वप्निल संतोष मलमे (२०, रा.खरसिंग, ता.कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.शहरातील शंभरफुटी रोडवरील माने चौकापासून जवळच गुलाब कॉलनीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला याचा बांधकाम साहित्य पुरवठा करण्याचा बाबा सप्लायर्स नावाने व्यवसाय आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास तो आपल्या घरासमोर थांबला होता. यावेळी कुरणे, मलमे व कोळपे तिथे आले. दोघांनी बंदुकीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या, तर एकाने कोयत्याने वार केला. यातील अल्पवयीन मुलगा घटनास्थळापासून थोड्या अंतरावर दुचाकी सुरू करून उभा असल्याचे तपासात समोर आले आहे.२०१९ मध्ये महेश नाईक याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित सचिन डोंगरे याचा जामीन होऊ नये, यासाठी नालसाब प्रयत्न करत होता. त्याच्यामुळेच डोंगरेला जामीन मिळत नाही, याचा राग मनात धरूनच खून केल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले.दरम्यान, एलसीबीच्या पथकाने संशयितांकडून दोन पिस्तूल, दुचाकी, कोयता जप्त केला आहे. संशयितांनी हल्ल्यासाठी मध्य प्रदेशमध्ये तयार केलेले पिस्तूल वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयितांनी पिस्तूल कोठून आणले, याचा तपास सुरू आहे. संशयित तिघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

सचिन डोंगरेला ताब्यात घेणारमहेश नाईक खुनातील मुख्य संशयित सचिन डोंगरे सध्या कारागृहात आहे. त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नालसाब मुल्लाच्या खुनातही त्याचा सहभाग स्पष्ट झाल्याने, त्याला कारागृहातून चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस