शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: "आता माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही;" विजयानंतर आर.आर.पाटलांच्या मुलाचं विरोधकांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 11:31 IST

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: कवठेमहांकाळ नगरपरिषद राष्ट्रवादीकडे. आर.आर.पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांचा विजय.

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा कवठेमहांकाळ नगरपंचायतीत विजय झाला असून रोहित पाटील यांनाही विजय मिळाला आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलला १०, तर शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला. तर एका जागी अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. मतदानापूर्वी रोहित पाटील यांनी केलेल्या भाषणातील वक्तव्याची सर्वच ठिकाणी चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेची सांगता रोहित पाटील यांच्याच भाषणानं झालं होती. यावेळी त्यांनी आपले वडील आर. आर. पाटील यांची आठवण काढली होती. "आमच्या मनातील पॅनल निवडलंय असं सर्वसामान्यांचं मत आहे. सर्वसामान्य माणसानं राष्ट्रवादीला खांद्यावर घेतलंय. त्यांनी पक्षाची जबाबदारी घेतलीये. या निवडणुकीचा निकाल १९ जानेवारीला जाहीर होईस. निकाल लागल्यानंतर माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही," असं ते म्हणाले होते. 

रोहित पाटलांनी दिली प्रतिक्रिया"निवडणुकीच विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं होतं. माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही," अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी विजयानंतर दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा