शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: नागज घाटातील खून अनैतिक संबंधातून; मृत, आरोपी कर्नाटकातील विजापूरचे, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 13:21 IST

कवठेमहांकाळ : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील घाटात खून करून मृतदेह डिझेल ओतून जाळलेली व्यक्ती कर्नाटकातील विजापूर येथील असून, मृताच्या ...

कवठेमहांकाळ : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील घाटात खून करून मृतदेह डिझेल ओतून जाळलेली व्यक्ती कर्नाटकातील विजापूर येथील असून, मृताच्या पत्नीशी आरोपीचे असलेले अनैतिक संबंध व पैशाच्या व्यवहारातून आरोपीने चौघा साथीदारांसह खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.शरीफ हसनसाब गनवार (वय ३४, रा. अल्लापूर वेस नुराणी मस्जिदजवळ, विजापूर, कर्नाटक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, आरोपींमध्ये रफिक शब्बीर महंमदापूर (वय ३२), यासीन अन्वर बल्लरी (वय ३०), मोसिन अन्वर बल्लारी (वय २८), अल्लाउद्दीन मेहबूबसाब बावची (वय २७, सर्व रा. ख्वाॅजा मस्जिद, जेल दर्गा परिसर, विजापूर, रा. कर्नाटक) यांचा समावेश आहे. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, विजापूर-गुहागर राज्य मार्गावर काही दिवसांपूर्वी नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील घाटात एका अनोळखी व्यक्तीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता. यानंतर मृताची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत ती कर्नाटकात फिरवली. यावेळी कर्नाटक राज्यातील विजापूर येथील शरीफ हसनसाब गनवार हे बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीने गोलघुमट विजापूर पोलिसात दिली होती.त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता, त्यांचा खून आरोपी महंमदापूर याने त्याच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून व पैशाच्या वादातून साथीदारांसह केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस