शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक पूजा, गुलालाची उधळण, प्रतिकात्मक नाग मूर्तीची मिरवणूक; शिराळ्यात नागपंचमी शांततेत साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 18:48 IST

मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी

विकास शहाशिराळा : "अंबाबाई च्या नावाने चांगभले" च्या गजरात लाखो भाविकांच्या शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी २००२ पासून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत  प्रतिकात्मक नाग मूर्तीची  मिरवणूक काढून शांततेत साजरी करण्यात आली. या वर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.  अंबामाता मंदिरात देवीचे दर्शन, पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत , मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा , पालखी पूजा , घरी महिलांनी नाग मूर्तीची पूजा करून यावर्षी नागपंचमी साजरी केली. जिवंत नागांचे दर्शन न झाल्याने भाविकांमध्ये नाराजी होती.नागपंचमी सण साजरा झाल्याने भाविकात व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. नाग मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सकाळच्या सुमारास नागाच्या प्रतिमेचे पुजन करून आंबामातेचे दर्शन घेतले.मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी एक च्या दरम्यान मानाच्या पालखीचे प्रमोद महाजन, रामचंद्र महाजन यांच्या घरी पूजन होऊन ही पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी आली. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, सुनीता नाईक यांनी पालखीचे पूजन केले. पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी आल्यावर मिरवणुकीस सुरुवात झाली. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या प्रशासनाने १३५ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. शहरात विविध ठिकाणी ७ तपासणी नाके उभारले होते. पोलीस विभागाकडून १६ व्हिडिओ कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यात आले. वाद्यांच्या ध्वनी मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बारा ध्वनिमापक यंत्रे ठेवण्यात आली होती. तसेच आरोग्य विभागामार्फत आवश्यक औषधांचा साठा व सर्पदंशाची लस उपलब्ध केल्या होत्या.  

टॅग्स :SangliसांगलीNag Panchamiनागपंचमीshirala-acशिराळा