दाखल्यासाठी कागदपत्रांमध्ये परस्पर बदल; विद्यार्थिनीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 19:23 IST2020-02-11T19:20:35+5:302020-02-11T19:23:05+5:30
त्या मुलीने पलूस येथील महा ई-सेवा केंद्रातून जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करून तिला हवा असलेला दाखला मिळण्यासाठी वंशावळ जोडणे आवश्यक होते.

दाखल्यासाठी कागदपत्रांमध्ये परस्पर बदल; विद्यार्थिनीवर गुन्हा
पलूस - (सांगली) : पलूस येथे जातीच्या दाखल्यासाठी मूळ दस्तऐवजात परस्पर बदल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन प्रदीप पाटील यांनी एका विद्यार्थीनीविरोधात सोमवारी पलूस पोलिसात फिर्याद दिली आहे.
एका विद्यार्थीनीने महाविद्यालयातील प्रवेशाकरीता २४ सप्टेंबर २०१९ रोजी तहसील कार्यालयात जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता. दुधोंडी (ता. पलूस) येथील जिल्हा परिषद शाळेतून तिने उद्धव आनंदा मदने यांचा दाखला उपलब्ध केला. त्यावर वडिलांचे नाव लिहून मूळ दस्तऐवजात बदल केला. पडताळणीमध्ये शाळा प्रशासनाने संबंधित नावे कोणताही दाखल दिला नसल्याचे कळवले. त्या मुलीने पलूस येथील महा ई-सेवा केंद्रातून जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करून तिला हवा असलेला दाखला मिळण्यासाठी वंशावळ जोडणे आवश्यक होते. यासाठी मूळ दस्तऐवजात तिने बदल केल्याप्रकरणी पलूस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.