सांगली : अल्पसंख्याकांना जाणीवपूर्वक व वारंवार नाहक त्रास देणारे आमदार गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच पडळकरांची आमदारकी रद्द करावी, या मागणीकरिता व गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ सांगलीतील स्टेशन चौक येथील गांधी पुतळ्यासमोर मुस्लीम समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.मागील काही दिवसांपासून जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजप नेते गोपीचंद पडळकर तसेच संग्राम जगताप यांनी अल्पसंख्याक समाजाविषयी बेताल वक्तव्य केली. त्यांच्यावर सूड बुद्धीने आरोप केले. अल्पसंख्याक समाजाला यांनी सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे. त्यांच्यावर याप्रकरणी कारवाई व्हावी, गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी तसेच यांनी केलेल्या बदनामीकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुस्लीम समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी सलीम राज पन्हाळकर, सोहेल इनामदार, सनाउल्ला बावचकर, हाफिज मोहम्मद अली मुल्ला, आक्रम शेख, टिपू इनामदार, आसिफ पठाण, जावेद मुल्ला, आसिफ पठाण, जावेद मुल्ला, मुद्दसर मुजारव, राज शेख, अब्दुल रज्जाक तांबोळी, इब्राहिम बोजगर, मोहसीन शेख, मुन्ना पठाण, निहाल कुरेशी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या विरोधात मुस्लीम समाजाचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:15 IST