शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: दागिन्याची उधारी मागितल्याने शेटफळेत दोघांना भोसकले, हल्लेखोर पसार; सात जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 12:13 IST

पैसे देण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावले. तेव्हा चाकूने हातावर व पोटावर वार केले

आटपाडी : ज्वेलर्समधून पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या दागिन्यांची उधारी मागितल्याबद्दल शेटफळे (ता. आटपाडी) येथील सराफ सुरेश जयवंत गायकवाड (वय ४२) व हेमंत गायकवाड (३४) या दोघांना चाकू व खंजीरने भोसकले. तर, गायकवाड यांच्या चालकास बेदम मारहाण केली.बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी जखमी गायकवाड यांनी कोळे (ता. सांगोला) येथील संशयित रमेश आलदर, रावसो आलदर, बिरा खरात, नेताजी सरगर व अनोळखी तिघे अशा सात जणांविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सुरेश गायकवाड यांचे आटपाडीमध्ये शुभम ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे. या दुकानातून कोळे येथील एकाने सोने खरेदी केले होते. खरेदी केलेल्या सोन्याची काही रक्कम येणे बाकी होती. त्यामुळे गायकवाड हे काही महिन्यांपासून उधारीवर नेलेल्या ग्राहकांकडे पैशाची मागणी करत होते.दरम्यान, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेटफळे येथे सुरेश गायकवाड यांच्या घरासमोर संशयित रमेश आलदर, रावसो आलदर, बिरा खरात, नेताजी सरगर आणि तिघे जण आले होते. सुरेश गायकवाड यांना पैसे देण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावले. तेव्हा चाकूने त्यांच्या हातावर व पोटावर वार केले. गायकवाड यांच्या गाडीवरील चालकाला मारहाण केली.तसेच, हेमंत गायकवाड हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावरही धारदार शस्त्राने वार केला. तसेच, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे. सुरेश गायकवाड यास जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, त्यांचे मित्र बाळासाहेब जगदाळे यांची जीप (एमएच १० सीआर १२३) ची काच फोडून मोडतोड केली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.हल्ल्यातील जखमींवर आटपाडी येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी पद्मा कदम, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी भेट दिली. सहायक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी