शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांवर खुनी हल्ला, प्रकृती चिंताजनक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:31 IST

तीन महिन्यांपूर्वी अज्ञातांनी काठीने हल्ला केल्याची घटना घडली होती

सांगली : महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णा माळी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चाकू अडकल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कलानगर येथे घडली.हल्ल्यानंतर माळी यांच्या मित्रांनी टिंबर एरियातील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील माळी हे कुटुंबीयांसह कलानगर येथे राहतात. महापालिकेचे ते मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून काम करतात. माळी दिवसभर कामावर होते. सायंकाळी ते मित्रासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते. यावेळी बायपास रस्त्यावर त्यांनी चहा घेतला नंतर ते मित्रासह कलानगर येथील घराकडे गेले.यावेळी त्यांच्या घराजवळ दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोर दबा धरून बसले होते. माळी हे दुचाकीवरून उतरताच हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या चाकूने पोटात उजव्या बाजूला वार केले. वार इतका वर्मी होता की तो चाकू अडकून बसला. माळी यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. माळी यांच्या मित्रांनी तातडीने टिंबर एरियातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना इनाम धामणी रोडवरील एका रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान, या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

आयुक्तांसह अधिकाऱ्यांची धावहल्ल्याची माहिती मिळताच आयुक्त सत्यम गांधी, उपायुक्त स्मृती पाटील , उपायुक्त अश्विनी पाटील यांच्यासह उपअधीक्षक प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, अरुण सुगावकर यांच्यासह पोलिस पथकांनी रुग्णालयात धाव घेतली होती.

तीन महिन्यांपूर्वीही हल्लासुनील माळी यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी अज्ञातांनी काठीने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. ही घटना ताजी असतानाच त्यांच्यावर पुन्हा खुनी हल्ला झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Fire Chief Attacked; Condition Critical, Investigation Underway

Web Summary : Sangli's fire chief, Sunil Mali, was critically injured in an attack near his home. Two assailants stabbed him before fleeing. He is hospitalized, and police are investigating. Mali was attacked three months ago as well.