शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

Sangli: कामावरून वाद, पलूसमध्ये बँकेच्या महिला कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:44 IST

कार्यालयात मद्य प्राशन करून राडा घातला

पलूस : पलूसमध्ये एका बँकेच्या महिला कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली. बँकेच्या सेवा केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांच्या वादाचे पर्यवसान खुनी हल्ल्यात होऊन या कार्यालयातील कर्मचारी विश्वजित पोपट पिसाळ (वय ३७, रा. विद्यानगर कॉलनी, पलूस) याने त्याच सेवा केंद्रात काम करणाऱ्या महिला कर्मचारी स्नेहल सुशांत कोले (वय ३५, रा. विद्यानगर काॅलनी (वय ३५) यांना चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. ही घटना ४ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद महिलेचे पती सुशांत अशोक कोले यांनी पलूस पोलिसात दिली आहे.अधिक माहिती अशी, पलूस येथील स्नेहल कोले व विश्वजित पिसाळ हे दोघे एकाच कॉलनीत राहतात. दोघेही एका बँकेच्या सेवा केंद्रात नोकरीस आहेत. मागील अनेक दिवसांपासून दोघांच्यात कामाच्या कारणावरून वाद होत होते. मागील आठवड्यात या दोघांतील भांडणाची तक्रार वरिष्ठांना कळवली होती. यावर वरिष्ठांनी विश्वजित पिसाळ याला समज दिली होती. याचाच राग मनात धरून पिसाळ याने कार्यालयात मद्य प्राशन करून राडा घातला.यावेळी दोघांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. याचे पर्यवसान टोकाच्या भांडणात झाले. पिसाळ याने चाकूने स्नेहलवर वार करून गंभीर जखमी केले. यात स्नेहल कोले यांचा कंठ व श्वासनलिका तुटली आहे. त्यांना उपचारासाठी सांगलीत दाखल केले होते. मात्र कंठावरील शस्त्रक्रिया ही सांगलीत होत नसल्याने त्यांना पुण्याच्या हाॅस्पिटलमध्ये हलवले. हा खुनी हल्ला नेमक्या कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचा तपास पलूस पोलिस करत आहेत.

अन् संशयिताचा कट उधळलामहिला कर्मचारी यांच्यावर खुनी हल्ला झाल्याने पलूस शहरात तणावाचे वातावरण होते. खुनी हल्ला नेमक्या कोणत्या कारणांनी झाला याचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. कार्यालयात महिलांची कामकाजासाठी मोठी गर्दी असताना हा प्रकार घडताना महिलांनी मोठा आरडाओरडा केला, यामुळे संशयिताचा कट उधळला.