कवठेपिरानमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:06 IST2020-06-09T14:05:44+5:302020-06-09T14:06:35+5:30
मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे अनिल शामराव टोपकर (वय ३६) या तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कवठेपिरानमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून
सांगली : मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे अनिल शामराव टोपकर (वय ३६) या तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अनिल टोपकर हा आई, वडील, पत्नी व मुलासह कवठेपिरान येथे राहत होता. मंगळवारी सकाळी तो जनावरांना चारा आणण्यासाठी शेताकडे निघाला होता. कवठेपिरान सर्वोदय रस्त्यावर अनिल याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सहा ते सात वार केले.
हे घाव वर्मी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.