शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत पानटपरी फोडल्याच्या रागातून सराईत गुन्हेगाराचा खून, एकास अटक

By अविनाश कोळी | Updated: September 17, 2022 19:08 IST

पानटपरी फोडल्याचा जाब विचारला. यामुळे दोघांत बाचाबाची होऊन हाणामारी झाली. गणेश याने जिलानी यास छातीवर, पोटात, गुप्तांगावर ठोसे मारल्याने जिलानी बेशुद्ध होऊन तेथेच पडला.

मिरज : मिरजेत रेल्वेस्थानक रस्त्यावर पानटपरी फोडल्याच्या रागातून सराईत गुन्हेगार जिलानी इसामुद्दीन कुडचीकर (वय ४७, रा. बागलकोट, कर्नाटक) याचा छातीत, पोटात व गुप्तांगावर ठोसे मारून खून करण्यात आला. याप्रकरणी गणेश खन्ना नायडू (वय ३१, रा. रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज) या संशयितास गांधी चौक पोलिसांनी अटक केली. नायडू यास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.रेल्वेस्थानक परिसरात गांजा विक्री करणारा गणेश नायडू व चोऱ्या, पाकीटमारी करणारा जिलानी कुडचीकर हे दोघे गुन्हेगार एकमेकांचे मित्र होते. रेल्वेस्थानक रस्त्यावर गणेश नायडू याची अनधिकृत पानटपरी असून, या टपरीवर जिलानी कुडचीकर हा नेहमी जात होता.गुरुवारी रात्री पानटपरीजवळ येऊन गणेश याच्याकडून काही रक्कम घेऊन जिलानी कुडचीकर हा तेथून निघून गेला. त्यानंतर शुक्रवारी पहाटे गणेश याची पानटपरी फोडण्यात आली. जिलानी याने पान दुकान फोडून रोख रक्कम व सिगारेट पाकीट चोरून नेल्याचा गणेश यास संशय होता.पानटपरी फोडल्याने संतापलेला गणेश हा जिलानी याच्या मागावर होता. शुक्रवारी पहाटे जिलानी हा रेल्वेस्थानक रस्त्यावर एका मंदिरासमोर थांबल्याची माहिती मिळाल्याने गणेश नायडू तेथे गेला. गणेश याने जिलानी यास पानटपरी फोडल्याचा जाब विचारला. यामुळे दोघांत बाचाबाची होऊन हाणामारी झाली. गणेश याने जिलानी यास छातीवर, पोटात, गुप्तांगावर ठोसे मारल्याने जिलानी बेशुद्ध होऊन तेथेच पडला.त्यास मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे जिलानी कुडचीकर याचा मृत्यू झाला. जिलानी कुडचीकर याच्या खूनप्रकरणी गणेश नायडू या सराईत गुन्हेगारास गांधी चौक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस