शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत खुनी हल्ल्यातील संशयिताचा निर्घृण खून, हल्लेखोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 12:25 IST

पाणी-पाणी करत जीव गेला

सांगली : खुनी हल्ला व युवतीच्या अपहरणाच्या गुन्ह्यातील संशयित राहुल संजय साळुंखे (रा. १९, रा. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, सांगली) याचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला, तर त्याचा साथीदार तेजस प्रकाश करांडे (वय २१, रा. जामवाडी) हा जखमी झाला. रात्री सव्वाआठच्या सुमारास हा गणपती मंदिराच्या दारात हा प्रकार घडला. त्यामुळे भाविकांची पळापळ झाली. प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संशयितांना उशिरा ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत राहुल साळुंखे हा जामवाडीमध्ये राहतो. जुना बुधगाव रस्ता आणि जामवाडीतील मित्रांचा त्याचा ग्रुप आहे. जानेवारी महिन्यात दि. १८ रोजी कोयत्याचा धाक दाखवून सांगली कोल्हापूर रस्त्यावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे भर दुपारी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यावेळी मुलीच्या आईवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला होता.सांगली शहर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुलीची सुटका केली होती. याप्रकरणी समर्थ भारत पवार (वय २२, रा. जुना बुधगाव रस्ता, राजीव गांधीनगर, सांगली), राहुल संजय साळुंखे (रा. १९, रा. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, सांगली), आदित्य गणेश पवार (वय २०, रा. पंत मंदिरनजीक, जामवाडी, सांगली), शुभम नामदेव पवार (वय २२ रा. श्रीनिवास अपार्टमेंट, गावभाग, सांगली) या टोळीला अटक केली होती.

खुनी हल्ला, अपहरणाच्या गुन्ह्यात अटक झालेला राहुल साळुंखे काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. सांगलीतील गणपती मंदिर परिसरात त्याचा अड्डा असायचा. बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास तो दुचाकीवरून गणपती मंदिरासमोर आला. दुचाकी लावल्यानंतर त्याला हल्लेखोरांनी घेरले. धारदार शस्त्राने त्याला भोसकल्यानंतर तो खाली पडला. त्याचा मित्र तेजस कारंडे याच्या डोक्यावर हल्ला केला. मंदिरासमोर स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भाविकांची गर्दी होती. याच गर्दीत हल्ला करून हल्लेखोर पसार झाले.सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गर्दी हटवून पंचनामा केला. जखमी तेजस कारंडे याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिस पथकाला सूचना दिल्या.

पाणी-पाणी करत जीव गेलागणपती मंदिराच्या दारात भोसकल्यानंतर जखमी राहुल समोरच असलेल्या नारळ-पेढे विक्री दुकानाच्या दारात तडफडत आला. पाणी-पाणी करतच त्याने दुकानाच्या समोर प्राण सोडला.

पूर्ववैमनस्यातून खुनाची शक्यताजानेवारी महिन्यात मुलीचे अपहरण करताना आईवर खुनी हल्ला झाला होता. त्याच वादातून जामिनावर आलेल्या राहुलचा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस