शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील जरंडीत बापाकडून मुलाचा खून, आत्महत्येचा केला होता बनाव; पोलिसांनी रक्षाविसर्जनालाच लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 12:51 IST

एका मुलाच्या लग्नादिवशी दुसऱ्या मुलाचा खून

तासगाव : जरंडी (ता. तासगाव) येथील मंडले वस्ती येथे गुलाब भगवान मंडले (वय ५२) याने स्वतःचाच मुलगा विशाल गुलाब मंडले (१८) याचा खून करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा भांडाफोड झाला. ९ मे रोजी खून करून रात्री अंत्यविधी केल्यानंतर तासगाव पोलिसांना सुगावा लागला आणि शुक्रवारी रक्षाविसर्जनालाच जरंडीत जाऊन खुनाचा उलगडा केला. संशयितावर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून, याबाबत विशालच्या आईने फिर्याद दिली आहे.गुलाब मंडलेचा मुलगा विशालला दारूचे व्यसन होते. विशाल अविवाहित होता. त्याने बुधवारी वडिलांकडे लग्नाचा तगादा लावला. यातून ९ मे रोजी दोघांत जोरदार वाद सुरू झाला. विशालला गुलाबने एचटीपी पाइपने मारहाण केली. गुप्तांगावर फटका बसल्याने तो जागीच मृत झाला. त्यानंतर गुलाबने बनाव रचला आणि विशालने आत्महत्या केल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. घाईगडबडीत रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले.शुक्रवारी विशालचे रक्षाविसर्जन होते. दरम्यान, गुलाबने विशालचा खून करून अंत्यसंस्कार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती कळल्यानंतर शुक्रवारी रक्षाविसर्जनाच्या वेळीच पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे आणि त्यांच्या पथकाने जरंडी येथे धाव घेतली. मृत विशालच्या कुटुंबीयांकडे कसून चौकशी केल्यानंतर गुलाबने खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

एका मुलाच्या लग्नादिवशी दुसऱ्या मुलाचा खूनगुलाब मंडलेच्या मोठ्या मुलाचे दोन वर्षांपूर्वी ९ मे रोजी लग्न झाले. याच दिवशी धाकट्या मुलाने लग्नावरून वाद सुरू केल्यामुळे, बाप-लेकात झालेल्या भांडणात बापाने मुलाचा याचा खून केला. खून झाल्यानंतर रक्षाविसर्जन होईपर्यंत विशालने आत्महत्या केली, अशीच माहिती गावात होती. मात्र पोलिसांनी गुलाबला ताब्यात घेतल्यानंतर या खुनाची मोठी चर्चा झाली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस