शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील आरेवाडीमधील तरुणाचा खून प्रेमसंबंधातून, पाच जणांवर गुन्हा; हल्लेखोरांचा शोध सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:38 IST

मंदिरातील कार्यालयातच केला होता खून

ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा मंदिरासमोरील देवस्थानच्या देणगी कार्यालयात मंगळवार दि. २२ रोजी मारुती ऊर्फ नाना जगन्नाथ कोळेकर या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला होता. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, फरारी हल्लेखोरांच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी मृत मारुती कोळेकर याचा चुलत भाऊ बिरू बाळासाहेब कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे.याप्रकरणी अनिल श्रीरंग कोळेकर (वय ३५), संजय श्रीरंग कोळेकर (३०), बंडू दामाजी कोळेकर, इंद्रजित काशिलिंग कोळेकर (२७, सर्व रा. आरेवाडी), अमोल युवराज घागरे (वय २५ रा. ढालगाव) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत मारुती कोळेकर याचे हल्लेखोर अनिल व संजय कोळेकर यांच्या नात्यातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता. यादरम्यान हल्लेखोरांच्या नात्यातील अमोल युवराज घागरे (रा. ढालगाव) याने मंगळवारी सकाळी मारुतीला धमकावले होते. यावेळीही त्यांच्यात वाद झाला. यानंतर मारुती हा देवस्थान समितीच्या देणगी कार्यालयात जाऊन बसला.याची माहिती मिळताच अनिल कोळेकर, संजय कोळेकर, अक्षय ऊर्फ बंडू कोळेकर, तसेच अमोल घागरे (रा. ढालगाव) व इंद्रजित कोळेकर (रा. आरेवाडी) हे सर्वजण बनात आले. बिरोबा मंदिरासमोरील देणगी कार्यालयात घुसून त्यांनी दाराची कडी आतून लाऊन घेतली. चाकूसारख्या धारधार शस्त्राने मारुतीच्या पोटावर, मानेवर, हातावर, पाठीवर वार करून त्याचा खून केला. इंद्रजित कोळेकर याने हल्ल्यासाठी शस्त्रे आणल्याची माहिती समोर आली आहे.घटनेनंतर पाचही हल्लेखोर फरारी असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले. दरम्यान, या खून प्रकरणामुळे ढालगावसह परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बिरोबा मंदिरासमोरील देणगी कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी रात्री उशिरा मृत मारुती कोळेकर याच्या पार्थिवावर आरेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस