कवलापूर येथे परप्रांतिय मजूराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 13:56 IST2020-07-28T13:55:37+5:302020-07-28T13:56:45+5:30
सांगली : सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे कुंदन कुमार गुरव (वय २३. सध्या रा. कवलापुर, मूळ जाफरागंज, बिहार) या परप्रांतिय ...

कवलापूर येथे परप्रांतिय मजूराचा खून
सांगली : सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे कुंदन कुमार गुरव (वय २३. सध्या रा. कवलापुर, मूळ जाफरागंज, बिहार) या परप्रांतिय तरुणांचा चाकूने भोकसून सोमवारी मध्यरात्री खून करण्यात आला. बालिकेशी गैरवर्तन केल्याच्या रागातून ही घटना घडल्याचे समजते.
सांगली ग्रामीण पोलीस या खुनाचा तपास करीत आहे. मृत कुंदन हा गावातील वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. त्याने गावातील बालिकेशी गैरवर्तन केले होते. याच्या रागातून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
त्याच्यावर चाकूने तीन ते चार वार करण्यात आले. छातीवर घाव वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.