जन्मदात्या आईचा मुलाकडून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST2021-02-15T04:24:29+5:302021-02-15T04:24:29+5:30
मंगळवार, दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी जनाबाई माने या घरासमोरील चेंबरवर कपडे धूत हाेत्या. यावेळी धाकटा मुलगा अप्पासाहेब माने ...

जन्मदात्या आईचा मुलाकडून खून
मंगळवार, दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी जनाबाई माने या घरासमोरील चेंबरवर कपडे धूत हाेत्या. यावेळी धाकटा मुलगा अप्पासाहेब माने तेथे आला. आणि जनाबाई यांना ‘जेवायला दे’ म्हणू लागला. यावेळी कपडे धूत असलेल्या जनाबाई त्याला ‘तुला आणखी किती दिवस जेवण घालू’ असे म्हणाल्या. या रागातून अप्पासाहेब याने बाजूला पडलेले लाकडी दांड्याचे खोरे हातात घेऊन जनाबाई यांच्या कानावर व डोक्यात हल्ला केला. यावेळी अप्पासाहेब याचा थोरला भाऊ सत्यवान शिवाजी माने (वय ४२) व वडील शिवाजी माने त्यास अडविण्यास धावले. अप्पासाहेब याने त्यांनाही मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केली. गंभीर जखमी अवस्थेत जनाबाई यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सत्यवान शिवाजी माने यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली असून सहायक निरीक्षक संदीप साळुंखे अधिक तपास करीत आहेत.
फाेटाे : १४ आप्पासाहेब माने