Municipal corporation's ruling councilors' agitation | महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांचे आंदोलन

महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांचे आंदोलन

ठळक मुद्देमहापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांचे आंदोलनसाडेचार कोटी रुपयांच्या कामांचा समावेश

सांगली : गेल्यावर्षीच्या अंदाजपत्रकात मंजूर प्रभाग १२ मधील साडेचार कोटी रुपयांची विकासकामे प्रशासनाने अडविली आहेत. ही कामे सुरू करावीत, यासाठी सत्ताधारी भाजपच्या माजी उपमहापौरांसह चारही नगरसेवकांनी गुरुवारी बेमुदत उपोषण आंदोलन हाती घेतले. सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना उपोषण करावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, भाजपचे नगरसेवक संजय यमगर, लक्ष्मी सरगर, नसीमा शेख यांच्यासह प्रभागातील नागरिक सहभागी झाले होते. महापौर गीता सुतार, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांबाबत सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली.

आंदोलनाबाबत सूर्यवंशी म्हणाले, प्रभाग १२ मधील नागरिकांच्या मागणीनुसार गेल्यावर्षीच्या अंदाजपत्रकात काही कामे सुचविली होती. यामध्ये वखारभाग माहेश्वरी भवन ते सांगली हायस्कूल रस्ता हॉटमिक्स, डांबरीकरण करणे, गुजराथी हायस्कूलमागील रस्ते हॉटमिक्स, डांबरीकरण, वखारभाग ईदगाहसमोरील रस्ते डांबरीकरण, डांबरीकरण, जामवाडी टांगा अड्डा परिसर, गणपती पेठ रस्ता, मगरमच्छ कॉलनी अंतर्गत रस्ते, कर्नाळ रोड, भगत प्लॉट, जुना बुधगाव रस्ता आदी सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या कामांचा त्यात समावेश होता.

Web Title: Municipal corporation's ruling councilors' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.