आष्ट्यात लाल मातीतील कुस्तीला पालिकेने प्रोत्साहन द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:18+5:302021-07-07T04:32:18+5:30

आष्टा शहरातील लाल मातीतील कुस्ती पालिकेने सुरू करावी, या मागणीचे निवेदन रायगड सेवाभावी संस्थेचे तुषार सूर्यवंशी यांनी दिले. यावेळी ...

Municipal Corporation should promote red clay wrestling in Ashta | आष्ट्यात लाल मातीतील कुस्तीला पालिकेने प्रोत्साहन द्यावे

आष्ट्यात लाल मातीतील कुस्तीला पालिकेने प्रोत्साहन द्यावे

आष्टा शहरातील लाल मातीतील कुस्ती पालिकेने सुरू करावी, या मागणीचे निवेदन रायगड सेवाभावी संस्थेचे तुषार सूर्यवंशी यांनी दिले. यावेळी हर्षवर्धन सूर्यवंशी, किरण गायकवाड उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा शहरात लाल मातीतील कुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील तालीम तांत्रिक अडचणीमुळे बंद आहेत. शहरातील पालिकेच्यावतीने लाल मातीतील कुस्तीचे प्रशिक्षण द्यावे व त्यांच्यासाठी प्रशिक्षक नेमावा, त्यांना मानधनही सुरू करण्यात यावे, अशी मागणी रायगड सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तुषार सूर्यवंशी यांनी मुख्याधिकारी डॉ. कैलाश चव्हाण यांच्याकडे केली आहे.

आष्टा शहराने नावाजलेले अनेक मल्ल आजपर्यंत घडविले आहेत. पण, काळाच्या ओघात व्यायामाच्या सवयींमध्ये बदल होत गेल्याने मातीतील कुस्तीकडे दुर्लक्ष होत गेले. आष्टा शहरातील चव्हाणवाडी येथील जयहिंद तालमीसारख्या एकेकाळी नावाजलेल्या तालमी काही तांत्रिक अडचणींमुळे पूर्णपणे बंद असल्याने व त्यांची दुरावस्था झाल्याने नवोदित कुस्ती मल्लांची प्रचंड गैरसोय होत आहे. नगरपालीकेमार्फत वेगवेगळ्या कुस्ती स्पर्धांसाठी मल्लांना आष्टा नगरपालीकेमार्फत मानधन सुरू करावे, याबाबतचे निवेदन कार्यालयीन अधीक्षक आनंदा कांबळे यांना देण्यात आले

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष उमेश डांगे, सौरभ शेळके, राजवर्धन थोरात, पैलवान हर्षवर्धन सुर्यवंशी, इंद्रजीत वळवडे, अजय काळोखे, अमर कुराडे, ऋतुराज जुगदर, पंकज माळी, सचिव किरण गायकवाड, अक्षय चव्हाण, सुनील पाटील व आष्टा शहरातील कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

Web Title: Municipal Corporation should promote red clay wrestling in Ashta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.