महापालिकेकडून कुपवाडमध्ये १४ हजार रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:37+5:302021-04-23T04:29:37+5:30
कुपवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी एका दिवसात महापालिका प्रशासनाने ...

महापालिकेकडून कुपवाडमध्ये १४ हजार रुपयांचा दंड वसूल
कुपवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी एका दिवसात महापालिका प्रशासनाने व्यावसायिकाकडून १४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
ते म्हणाले, महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कुपवाड शहर प्रभाग समिती तीनमधील वाॅर्ड नंबर एक, दोन व आठ या तीन वाॅर्डांत विनामास्क फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, तसेच दुकाने, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन या वेळी दुकानदार, भाजीपाला विक्रेते, व्यावसायिकांना करण्यात आले. जे कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त गायकवाड यांनी दिली आहे.