शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला; २३ वर्षांनी भाजपमध्ये फेरप्रवेश करताना अण्णा डांगेंनी मोकळे केले मन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:20 IST

''जो' प्रवेश तुमच्या मनात आहे तो आमच्या मनात नाही'

मुंबई/इस्लामपूर : आपले मेहुणे गोपीनाथ मुंडे यांना पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे, असे एका घटनाक्रमाने प्रमोद महाजन यांच्या मनात आले आणि तेव्हापासून माझा छळवाद सुरू झाला, त्यामुळे मी भाजप सोडून गेलो, अशी वेदना ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी बुधवारी शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करताना बोलून दाखविली. ‘अण्णा! आपण भाजप सोडून गेलात याची खंत मुंडे साहेबांनाही होती’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मग सावरून घेतले.आपले दोन मुलगे चिमण आणि विश्वनाथ तसेच समर्थकांसह अण्णांनी २३ वर्षांनंतर भाजपमध्ये घरवापसी केली. प्रदेश भाजप कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात अण्णा डांगे म्हणाले की, जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बरे-वाईट बोलणे योग्य नाही पण पक्षात त्यावेळी एक चुरस निर्माण झाली. अटलजींना कोणी विचारले की आपले उत्तराधिकारी कोण त्यावर त्यांनी प्रमोद महाजन यांच्यासह तीन-चार नावे घेतली. आपण पंतप्रधान होणार, असे महाजन यांच्या डोक्यात शिरले मग आपले मेहुणे गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असेही त्यांच्या मनात आले अन् तिथून माझा छळवाद सुरू झाला. गेल्या १५ दिवसांपासून माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे पुत्र, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे आणि माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. बुधवारी, दि. ३० रोजी मुंबईत त्यांच्या घरवापसीवर शिक्कामोर्तब झाले. यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक उपस्थित होते.

बाळासाहेबही माझ्या कामावर खूश होतेमाझ्याकडे असणाऱ्या पाणीपुरवठा खात्यामार्फत सुमारे साडेपंधरा हजार कोटी रुपयांची टँकरमुक्तीची योजना चांगल्या रितीने राबविली जात होती. या कामाची दखल सर्वदूर घेतली गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या माझ्या कामावर खूपच खूश होते. उद्या भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी माझे नाव आले तर बाळासाहेब ते उचलून धरतील, असे चित्र होते, तेही अडचणीचे ठरले, असे अण्णा डांगे म्हणाले. 

‘तो’ प्रवेश आमच्या मनात नाहीसांगली जिल्ह्यातील आणखी कोणी मोठे नेते भाजपमध्ये येणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जो प्रवेश तुमच्या मनात आहे तो आमच्या मनात नाही.

घरची व्यक्ती घरी आल्याचा आनंद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अण्णा..आपण ज्येष्ठ आहात. आम्ही आपल्याला काय सांभाळणार? आपणच आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही चांगले काम करत राहू.  परखड स्वभाव असलेले अण्णा एका विशिष्ट परिस्थितीत पक्ष सोडून गेले, पण गोपीनाथरावांना त्याची नेहमीच खंत होती. तेव्हाही पक्षात त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान होता. अण्णांनी पक्ष सोडला पण त्यांच्यावर झालेला संस्कार आणि त्यातून तयार झालेला विचार त्यांनी कधीही सोडला नाही.  भाजप हेच आपले घर आहे हीच त्यांची भावना नेहमी राहिली, घरची व्यक्ती घरी आल्याचा आम्हालाही आनंद आहे.  यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, चिमण डांगे आदींची भाषणे झाली.

पदाधिकाऱ्यांचा भाजपप्रवेश  अण्णासाहेब डांगे यांच्या भाजप प्रवेशासह इस्लामपूर येथील सुभाष देसाई (माजी नगरसेवक, अध्यक्ष - इस्लामपूर सर्व सेवा सोसायटी), भानुदास वीरकर (माजी जिल्हा परिषद सदस्य), अमोल आनंदराव चौधरी (अध्यक्ष, दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लिमिटेड, इस्लामपूर), श्रीकांत माने (माजी नगरसेवक), महंमद गणीभाई (माजी नगरसेवक), जालिंदर कोळी (माजी नगरसेवक), गोपाल नागे (अध्यक्ष, सामाजिक न्याय सेल, राष्ट्रवादी पक्ष), तसेच बुरूड समाज सेवा संघटना, अभिजित रासकर (उपाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी पक्ष, इस्लामपूर), बाळासाहेब खैरे (जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) या पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.