शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

सांगली जिल्ह्यातील बिऊरच्या गवती चहाची मुंबईकरांना भूरळ

By हणमंत पाटील | Updated: January 18, 2024 16:28 IST

विकास शहा शिराळा : बिऊर ( ता.शिराळा ) गाव आता गवती चहाचे गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. तब्बल ...

विकास शहाशिराळा : बिऊर ( ता.शिराळा ) गाव आता गवती चहाचे गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. तब्बल ७० पेक्षा जास्त शेतकरी या पिकाकडे वळले आहेत.  येथील शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड करुन मुंबई मार्केटमधे अल्पावधीत गवती चहाचे गाव अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.अल्प भुधारक व शेतीवर उदरनिर्वाह असणारे शेतकरी पैसा मिळवून देणाऱ्या पिकाकडे वळत आसून नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. अलिकडच्या काही वर्षात वातावरणातील बदल पावसाची अनियमितता अशा अनेक कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.परिणामी शेतीवरती उदरनिर्वाह असणारे  शेतकरी वर्षभर उत्पादन देणाऱ्या  पिकाकडे कल वाढलेला पहावयास मिळत आहे.गवती चहा ही तृणवर्गीय वनस्पती असून  एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीनंतर पाच महिन्यांनी पहिली कापणी सुरु होते. त्यानंतरची कापणी दर तीन महिन्यांनी करता येते.साधारणपणे वर्षात चार कापण्या होतात. गेल्या चार पाच वर्षापासून या परिसरात  काही  शेतकऱ्यांनी हे पिक घ्यायला सुरवात केली. अनुभव नसल्याने थोडाफार तोटाही सहन करावा लागला.मात्र नंतर तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय खत व जिवानू खताचा वापर करुन  गावखताचा मोठ्या प्रमाणात वापर व पाण्याचे योग्य नियोजन वेळेवर आंतरमशागत किटकनाकांचा वापर याची सांगड घालून उत्पादन घ्यायला सुरूवात झाली. मुंबई मार्केटमध्ये या तालुक्यातील अनेक व्यावसायिक आहेत त्यामुळे येथे मार्केटला माल पाठवायला सुरूवात झाली. या परिसरात लागवडीसाठी मध्यम काळी, पोयट्याची योग्य जमीन जमीन आहे.त्यामुळे कमी खर्चात ऊसापेक्षा जास्त उत्पादन मिळत असल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड केली आहे.अलिकडच्या काळात खूप जण गवती चहा पिणे पसंत करतात. गवती चहा ही अशी वनस्पती आहे ज्यामुळे चहाची चव वाढते. यामुळे बऱ्याच जणांच्या घरी अगदी आवर्जून गवती चहा पितात. त्याचबरोबर  यामध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असते गवती चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे मुंबई मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. सरासरी ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. 

योग्य नियोजन गवती चहा हे पिक इतर पिकापेक्षा परवडणारे आहे व कमी खर्चात कमी क्षेत्रात येते.त्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या पिकाला करपा रोगाचा  प्रार्दुर्भाव जास्त असतो.वेळेवर औषध फवारणी केली तर नियंत्रण करता येते.  - सचिन पाटील ( माजी सैनिक ) शेतकरी बिऊर - शांतीनगर 

टॅग्स :SangliसांगलीMumbaiमुंबई