Mumbai Doctor Death: मुंबईतील एका महिला डॉक्टरने इस्लामपूरजवळ गाडीत स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत रस्त्याकडेला मुंबईच्या महिला डॉक्टरने स्वतःच्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा ब्लेडने कापून आत्महत्या केली. मंगळवारी रात्री ११च्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि डॉक्टरला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
डॉ. शुभांगी समीर वानखडे (४४) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. डॉ. शुभांगी वानखेडे या मुलूंड पश्चिम येथील ईएसआयसी हॉस्पिटल क्वॉटर्समध्ये राहत होत्या. मंगळवारी सकाळी शुभांगी या दवाखान्यात जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या होत्या. त्यांचा मोबाइलही बंद होता. दवाखान्यात न जाता शुभांगी वानखडे या कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र विठ्ठलवाडी गावच्या पांढरावडा परिसरात त्यांची एमएच ०३ एआर १८९६ क्रमांकाची गाडी थांबली होती. या गाडीच्या मागेच त्यांनी स्वतःच्या डाव्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा कापून घेतल्या होत्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. रात्री ११च्या सुमारास माहिती मिळाल्यावर पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी शुभांगी वानखडे यांना उपचारासाठी इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात नेताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर डॉ. शुभांगी यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांना शुभांगी यांची गाडी पुण्याच्या दिशेने असल्याचे दिसले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यांना शुभांगी वानखेडेंचे ओळखपत्र मिळालं. शुभांगी या मोटारीच्या पाठीमागे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या गळ्यावर, हातावर ब्लेडचे खोलवर वार होते. त्यांच्या हातातून, गळ्यातून मोठा रक्तस्राव झाला होता. पोलिसांनी शुभांगी यांच्या मोटारीची तपासणी केली असता मोटारीतही रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी शुभांगी यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. डॉ.
शुभांगी वानखेडे यांच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. शुभांगी आणि त्यांचे पती समीर हे दोघेह डॉक्टर आहेत. कोरोनाच्या काळापासून त्यांच्यावर व्यावसायिक जीवनात तणा आणि निराशेचा सामना करण्याची वेळ आली होती. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. शुभांगी य तणाव आणि निराशेच्या गर्तेत अडकल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.