शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आटपाडीत धर्मांतराच्या संशयावरून मुंबईतील कुटुंबास पकडले, तिघांना दिले पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 16:08 IST

या प्रकाराने पुन्हा एखादा असंतोष पसरला

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडी येथे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने महिलांना एकत्रित करून एका विशिष्ट धर्माची प्रार्थना म्हणण्यास लावण्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला. हा प्रकार म्हणजे धर्मांतर करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याप्रकरणी मुंबईहून आलेल्या कुटुंबातील तिघांना पकडून ग्रामस्थांनी पोलिसांच्या हवाली केले.देशमुखवाडी येथे साेमवारी हा प्रकार सुरू हाेता. याची माहिती मिळताच गावातील युवकांनी एकत्रित येत धर्मांतर करण्यासाठी आलेल्या मुंबई येथील कुटुंबास जाब विचारला. यावेळी मोठा जमाव जमला होता. या कुटुंबाची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे विशिष्ट धर्माचे साहित्य सापडले. एक महिला, एक मुलगी व एक पुरुष असे तिघे देशमुखवाडी येथील महिलांना वेगवेगळ्या कारणासाठी बोलावून घेत त्यांना विशिष्ट धर्माच्या गोष्टी सांगत प्रार्थना म्हणण्यास भाग पाडत हाेते. ग्रामस्थांनी तिघांनाही पकडून आटपाडी पाेलिसांच्या ताब्यात दिले.दरम्यान, आटपाडीमध्ये काही महिन्यांपूर्वी एका दवाखान्यामध्ये मंत्र व प्रार्थना म्हणून रुग्णांना बरे करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. यावेळी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हाही धर्मांतराचा मुद्दा गाजला होता. आटपाडीमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला होता. विधानसभा व विधान परिषदेतही याचे पडसाद उमटले होते.यानंतर देशमुखवाडी मध्ये घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एखादा असंतोष पसरला आहे. देशमुखवाडी येथे आलेल्या संबंधित कुटुंबाला जमावाने आटपाडी पोलिसांच्या हवाली केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस