शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

मी जातो, तेथे ‘बाबरी’ हमखास पडते!; संजय राऊतांचा अनिल बाबरांना खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 17:17 IST

आमच्याशी जो टक्कर देईल, तो मातीतच जाईल.

विटा : शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून तुम्हाला निवडून आणले आणि तुम्ही ५० खोक्यात विकले गेलात, हा प्रकार विट्याची जनता विसरणार नाही, पण खोकेवाले आमदार आता अपात्रच होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या खोकेवाल्या आमदारांना घरी बसवायच्या तयारीत जनता आहे. मी जेथे जातो, तेथे ‘बाबरी’ हमखास पडते, असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार अनिल बाबर यांना लगावला.खा. राऊत यांच्या शुक्रवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर विटा मार्गे साताऱ्याकडे जात असताना त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या हजारो शिवसैनिक कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभूते, उपजिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे, राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील, ॲड. संदीप मुळीक, अविनाश चोथे, शंकर मोहिते, संग्राम माने उपस्थित होते.आ. बाबर यांचे नाव न घेता राऊत म्हणाले, येथील खोकेवाले आमदारांच्या उचापती मला सांगण्यात आल्या. गावागावांत पाणी कसे बंद केले, दादागिरी व दहशत कशी सुरू आहे, याची माहिती मला मिळाली. परंतु, त्यांना मी सांगू इच्छितो की, सामना शिवसैनिकांशी आहे, हे लक्षात ठेवा. आता शिवसेनेबरोबर कॉँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडी आहे. आमच्याशी जो टक्कर देईल, तो मातीतच जाईल.

टॅग्स :SangliसांगलीSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना