शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
2
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
3
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
4
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
6
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
7
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
8
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
9
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
10
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
11
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
12
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
13
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
14
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
15
बांगलादेशी खासदाराला अडकविले हाेते हनी ट्रॅपमध्ये; हत्येसाठी मित्रानेच दिली ५ कोटींची सुपारी
16
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
17
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
18
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
19
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
20
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य

चांदोलीत पर्यटन विकासाला चालना : शिवाजीराव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:31 AM

शिराळा : कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमेवर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली परिसर पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

ठळक मुद्देखुंदलापूर गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालाही गती मिळणार

शिराळा : कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमेवर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली परिसर पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. तसेच खुंदलापूर गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिली.मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहामध्ये व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानची बैठक अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस वन विभाग, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व इतर संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत निरनिराळ्या सोयी-सुविधा पुरविणे, त्याचबरोबर चांदोली अभयारण्यामध्ये असणाऱ्या वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाबद्दल तसेच त्यांना आवश्यक असणाºया तृणखाद्याबाबत व हिंस्र पशूंच्या अन्नखाद्यासंदर्भात चर्चा झाली. चांदोली अभयारण्यात वाघांची संख्या अत्यल्प असल्याने अन्य व्याघ्र प्रकल्पातील वन्य क्षेत्राच्या प्रमाणात जास्त असणाºया वाघांची माहिती घेऊन त्यामधील काही नर व मादी अशा जोड्या येथे आणून सोडणे शक्य आहे काय? याबाबत माहिती घेण्यात आली. वाघांना आवश्यक असणारे खाद्य, तृणभक्ष्यी प्राणी वाढविणे, त्यांच्यासाठी आवश्यक चारा लागवड करणे आणि या सर्वच प्राण्यांची व त्यांच्या अन्नसाखळीची मुबलक वाढ करणे, या उपाययोजना करत असताना वनतळी, बंधारे बांधून पाण्याची उपलब्धता करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

आ. नाईक म्हणाले, चांदोली अभयारण्य घोषित झाल्यानंतर या कार्यक्षेत्रातील गावांना विस्थापित करून निरनिराळ्या ठिकाणी गावठाण व इतर नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तथापि पुनर्वसित कुटुंबांना अद्यापही पुरेशा जमिनी मिळालेल्या नाहीत. त्याचबरोबर त्यांच्या जुन्या गावठाणातील घरे, फळझाडांची पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही. व्याघ्र प्रकल्प घोषित झाल्यानंतर या परिसरातील सांगली जिल्ह्यातील एकमेव खुंदलापूर या गावाचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही.

१९९५ पासून या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या गावासाठी (येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) येथे वन विभागाचे क्षेत्र देण्याचे निश्चित झाले आहे. तथापि हे क्षेत्र ‘डी फोरेस्ट’ वन विभागातून वगळून पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्याचा निर्णय देखील अजून प्रलंबित असल्याने या गावाचे पुनर्वसन दीर्घकाळापासून रखडले आहे.नागरिकांची संख्या निश्चित करावीवन विभागातील गावांच्या पुनर्वसनाबाबत पर्यायी जमिनी देणे, इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांच्या मालमत्तेची नुकसान भापाई देणे ही संपूर्ण बाब वन विभागाने पूर्ण करणे गरजेचे आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश करावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या. खुंदलापूरचे संकलित रजिस्टर तयार करत असताना कुटुंबांची संख्या, १ जानेवारी २०१८ ला १८ वर्षे पूर्ण असलेल्या नागरिकांची संख्या निश्चित करावी, असा आग्रह आ. नाईक यांनी धरला.

टॅग्स :Sangliसांगलीgovernment schemeसरकारी योजना