जिल्हा परिषदेत पेन्शनधारकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:30 IST2021-09-21T04:30:17+5:302021-09-21T04:30:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन बॅँकेत वेळत जमा केली जात नाही. यामुळे पेन्शनधारकांचे ...

जिल्हा परिषदेत पेन्शनधारकांचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन बॅँकेत वेळत जमा केली जात नाही. यामुळे पेन्शनधारकांचे हाल होत आहेत. याबाबत तातडीने मार्ग काढावा या मागणीसाठी आज जिल्हा परिषदेत आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यासाठी लागणारा निधी शासनाकडून दि. 26 ऑगस्ट रोजी प्राप्त झाला; पण 10 सप्टेंबरपर्यंतही निवृत्ती वेतनधारकांचे वेतन बँक खात्यात जमा झाले नाही. बरेच निवृत्ती वेतनधारक शुगर, उच्च रक्तदाब या व्याधीने त्रस्त आहेत. त्यांना वेळेवर औषधांची आवश्यकता आहे. शासनाचे ग्रामविकास विभागाकडून आलेल्या अनुदानाची देयके जिल्हा परिषदेकडील संबंधित अधिकारी कधीच वेळीच कोषागारात सादर न करणे, देयकाचा आलेला धनादेश सत्वर बँक खात्यात जमा न करणे, पंचायत समितीच्या बँक खाते आलेले अनुदान वेळेत वर्ग न करणे ही कामे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन व अर्थ विभागाकडून तत्परतेने होत नाहीत. यामुळे पेन्शन वेळेवर मिळत नाही. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा यापुढे आंदोलन तीव्र करण्यात येईल.