मिरजेत अट्टल मोटारसायकल चोरट्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:12+5:302021-07-01T04:19:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिरज, तासगाव परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. ...

मिरजेत अट्टल मोटारसायकल चोरट्याला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज, तासगाव परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. अमोल अशोक घोरपडे (वय ३१, रा. शिवशक्तीनगर, मिरज) असे संशयितांचे नाव असून त्याच्याकडून एक लाख ७२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील जबरी चोऱ्या व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक मिरज परिसरात गस्तीवर असताना, मिरजेतील इदगाह मैदान ते शंभरफूट रोडवर एकजण विनानंबरची दुचाकी घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्यास ताब्यात घेत चौकशीत त्याने साथीदार सार्थक सुतार (रा. साईनगर, संजयनगर,सांगली) याच्या मदतीने दुचाकी चोरत असल्याचे व घरफोडी केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून एक लाख ७२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल त्यात तीन दुचाकी, मोबाईल, मोबाईल कव्हर, चार्जर, सेल्फी स्टीक, डेटा केबल, ब्लुटुथ असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पाेलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप ढेरे, सुधीर गोरे, सचिन धोतरे, मुदस्सर पाथरवट, संदीप नलवडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.