शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आष्टा पोलिसांनी लावला दुचाकी चोरीचा छडा, सुमारे साडे सात लाखांच्या १७ गाड्या केल्या हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 17:02 IST

सुरेंद्र शिराळकर आष्टा : आष्ट्यासह यवत, हडपसर, जेजुरी, विश्रामबाग, कोरेगाव, फलटण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरून नेलेल्या सात लाख ६३ ...

सुरेंद्र शिराळकर

आष्टा : आष्ट्यासह यवत, हडपसर, जेजुरी, विश्रामबाग, कोरेगाव, फलटण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरून नेलेल्या सात लाख ६३ हजारांच्या १७ मोटारसायकली हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक मनीषा कदम यांनी दिली.याबाबत आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय अण्णाप्पा भानुसे (वय ४५, रा. आष्टा अप्पर तहसील कार्यालयासमोर) यांची मोटारसायकल ३० जुलै रोजी रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर यांच्यासह पोलिस हवालदार सुरेश भोसले, सुधीर साळुंखे, अरविंद संकपाळ, रूपाली पाटील, सूरज थोरात (सर्व आष्टा पोलिस ठाणे), अमरसिंह सूर्यवंशी (तासगाव पोलिस ठाणे) व सांगली सायबर पोलिस कॅप्टनसाहेब गुंडवाडे हे अज्ञात चोरट्याचा तपास करीत होते.सुरेश भोसले व सूरज थोरात यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आष्टा येथील मुंबई तलावाजवळ एक मोटारसायकलस्वार संशयितरीत्या वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आष्टा पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव नामदेव बबन चुनाडे (वय ५०, रा. अनिलनगर, पंढरपूर, जि. सोलापूर) असे सांगितले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आष्टा येथील दोन मोटारसायकलीसह इतर पंधरा मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्या मोटारसायकली विक्री करण्यासाठी त्याचे मित्र महादेव भारत भोसले (वय २५), भारत भोसले (रा. लक्ष्मीनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यांच्याकडून ७ लाख ६३ हजारांच्या सर्व १७ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. याबाबत आष्टा पोलिसांचे कौतुक होत असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब बाबर करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस