शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आई की वैरी..प्रियकराच्या साथीने केला पोटच्या मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 13:04 IST

पोटच्या मुलाचा खून करून मृतदेहावर परस्पर केले अंत्यसंस्कार.

आष्टा : पत्नीने प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाचा खून करून मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कार केल्याची फिर्याद सुशांत सुधीर वाजे (रा. वाळवा) यांनी बुधवारी रात्री आष्टा पोलिसांत दिली. मनन सुशांत वाजे (वय साडेतीन वर्षे) असे मृत मुलाचे नाव असून, याप्रकरणी प्राची सुशांत वाजे व तिचा प्रियकर अमरसिंह विश्वासराव पाटील (रा. बिळाशी, ता. शिराळा, सध्या रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आष्टा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाळव्यातील सुशांत वाजे यांचा प्राची हिच्याशी विवाह झाला असून, त्यांना मनन हा साडेतीन वर्षांचा मुलगा आहे. प्राचीचे अमरसिंह पाटीलसोबत अनैतिक संबंध आहेत. अमरसिंह पाटील मूळचा बिळाशी येथील असून, सध्या पश्चिम परेल (मुंबई) येथे वास्तव्यास आहे. अमरसिंह पाटीलने ऑगस्टमध्ये प्राचीला फूस लावून मुलगा मननसह पळवून नेले. अनैतिक संबंधासाठी तिला परेल येथील स्वत:च्या घरी ठेवले. ऑगस्ट ते ६ ऑक्टोबरदरम्यान प्राची व अमरसिंह हे दोघेही अनैतिक संबंधात अडथळा ठरतो म्हणून मनन यास मारहाण करून त्याचा छळ करत होते.

दि. ६ ऑक्टोबररोजी प्राची व अमरसिंहने मननचा खून केला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईतून अमरसिंहच्या मोटारीतून (क्रमांक एमएच १३ एडी ८०) तो बिळाशी येथे आणण्यात आला. मननच्या मृत्यूबाबत सुशांत वाजे यांना कोणतीही माहिती न देता वाकुर्डे बुद्रूक (ता. शिराळा) येथे मननवर अंत्यसंस्कार केले. मननच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. मननचा मृत्यू मुंबईत झाला असताना अमरसिंह व प्राची यांनी बिळाशीच्या ग्रामसेवकाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मृत्यू बिळाशीत झाल्याची खोटी माहिती दिली आहे.

याबाबत सर्व माहिती मिळाल्यानंतर सुशांत वाजे यांनी बुधवारी रात्री आष्टा पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक अजित सिद अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस