शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: खड्डा चुकवताना दुचाकी घसरून माय-लेक ठार, नातेवाईकांना भेटायला जाताना काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 18:47 IST

नाताळच्या सुटीसाठी आली होती माहेरी

इस्लामपूर : बहे (ता. वाळवा) गावच्या हद्दीत बहे-नरसिंहपूर रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात निघालेली दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवरील आई आणि ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी झाला.काजल चेतनसिंग हजारे (वय २८) आणि देवांश चेतनसिंग हजारे (वय ५, दोघे रा. कब्बुर, ता. चिकोडी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर दुचाकी चालवणारे चेतनसिंग विठ्ठलसिंग हजारे (वय ३२) हे जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत अनंत रामसिंग रजपूत (रा. इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतनसिंग हजारे याच्याविरूद्ध पत्नी आणि मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद केला आहे.काजल ही आपला मुलगा देवांश याच्यासह नाताळच्या सुटीसाठी इस्लामपूर येथील माहेरी आली होती. चिकोडी येथील गावी परतण्यापूर्वी किल्ले मच्छिंगड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी पती चेतनसिंग यांच्यासोबत दुचाकीवरून (एमएच १० बीडब्ल्यू ६०६) सकाळी तिघे निघाले होते. बहे ते नरसिंगपूर दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरली. त्यामुळे काजल आणि तिचा मुलगा देवांश हे रस्त्यावर पडून डोक्यास गंभीर मार लागून जखमी झाले. काजल हजारे यांना शहरातील खासगी रूग्णालयात तर मुलगा देवांश याला कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला. या अपघाताचा पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू