शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर लेकरांच्या अंगावर जात असल्याचे पाहून माउली जिवाच्या आकांताने धावली, मुले बचावली; पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 12:14 IST

धावताना अचानक पाय घसरला आणि ट्रॅक्टरला जोडलेला नांगराचा फाळ तिच्या डोक्यात घुसला

शिराळा : तडवळे (ता. शिराळा) येथे घरासमोर उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरून रस्त्यावर खेळत असलेल्या दोन लेकरांच्या अंगावर जात असल्याचे पाहून माउली जिवाच्या आकांताने धावली; पण धावताना अचानक पाय घसरला आणि ट्रॅक्टरला जोडलेला नांगराचा फाळ तिच्या डोक्यात घुसला आणि ट्रॅक्टर जागीच थांबला. रक्तबंबाळ झालेल्या माउलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही मुले बचावली; पण तिचा मृत्यू चटका लावून गेला.संचिता संपत पाटील (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. तडवळे येथे गावातच संपत पाटील यांचे घर आहे. त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर मंगळवारी नेहमीप्रमाणे रस्त्याकडेला उभा केला होता. मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान त्यांची पत्नी संचिता अंगणातील गोठा साफ करत होती, तर दोन्ही मुले कृषांत (वय २) व दुर्वा (वय ४) रस्त्यावर खेळत होती. रस्त्याच्या उतारामुळे अचानक ट्रॅक्टर सरकला. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांच्या दिशेने ट्रॅक्टर जात असल्याचे पाहून संचिता आरडाओरडा करीत ट्रॅक्टरच्या दिशेने धावल्या. मात्र, अचानक पाय घसरला आणि त्या ट्रॅक्टरच्या मागे जोडलेल्या नांगराच्या फाळावर जाऊन आदळल्या. नांगराचा अणकुचीदार फाळ डोक्यात घुसल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या. ट्रॅक्टरही थांबला. हा प्रकार पाहून मदतीसाठी धावलेल्या शेजाऱ्यांनी तत्काळ दोन्ही मुलांना ट्रॅक्टरसमोरून बाजूला केले. गंभीर जखमी झालेल्या संचिता यांना तातडीने इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.याबाबत शरद बबन पाटील यांनी शिराळा पोलिस ठाण्यात वर्दी दिली असून, हवालदार राजेंद्र माने तपास करीत आहेत. मृत संचिता यांच्यावर रात्री उशिरा तडवळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू, सासरे, दोन दीर, भावजय असा परिवार आहे. दाेन लेकरांना वाचविताना माउलीला मृत्यूने गाठल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू