मालकाच्या संमतीशिवाय फ्लॅट बँकेला तारण;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:23 IST2020-12-09T04:23:12+5:302020-12-09T04:23:12+5:30

याबाबत संजय शंकर केडगे (वय ५६) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे, तर नारायण शंकर मेहंदळे (६५, सध्या रा. ...

Mortgage to flat bank without owner's consent; | मालकाच्या संमतीशिवाय फ्लॅट बँकेला तारण;

मालकाच्या संमतीशिवाय फ्लॅट बँकेला तारण;

याबाबत संजय शंकर केडगे (वय ५६) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे, तर नारायण शंकर मेहंदळे (६५, सध्या रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

हरभट रस्त्यावरील केडगे हाईट्‌स या इमारतीत मेहंदळे यांनी दुसर्‍या मजल्यावरील एक फ्लॅट केडगे यांच्याकडून साडेतीन लाखांना खरेदी केला होता. त्यावेळी त्यांना बांधकाम परवाना देण्यात आला होता. मात्र नंतर केडगे यांनी सुधारित बांधकाम परवाना घेतला आहे. त्याला इमारतीतील रहिवाशांची पूर्वपरवानगी घेतलेली नाही. सुधारित नकाशे बेकायदेशीर आहेत, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान केडगे यांनी मेहंदळे यांच्या परस्पर त्यांची मालमत्ता एका बँकेकडे तारण ठेवून १५ कोटी ७७ लाखांचे कर्ज घेतले आहे. या सर्व प्रकरणात केडगे यांनी फसवणूक करून विश्वासघात केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. मेहंदळे यांच्या फिर्यादीनुसार केडगे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Mortgage to flat bank without owner's consent;