शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर मतदारसंघात मनीपॉवरचे राजकारण पेटणार; जयंत पाटील यांच्या स्टार प्रचारक समर्थकांपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 18:36 IST

अशोक पाटील इस्लामपूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर ...

अशोक पाटीलइस्लामपूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात मनीपॉवरच्या राजकारणाची चर्चा आहे. हातकणंगले लोकसभा निवडणुकीतही मनीपॉवरचा वापर झाला होता. आगामी विधानसभेला जयंत पाटील यांच्याविरोधात मनीपॉवरची ताकद वापरण्याचा डाव विरोधाकांकडून आखला जात आहे. त्यामुळेच पाटील यांच्या स्टार प्रचारक समर्थकांपुढे मोठे आव्हान राहणार आहे.गेल्या सात विधानसभा निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांच्या मताधिक्याच्या आकडेवारीचा आलेख पाहता विरोधी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. सध्या भाजप आणि शिंदेसेनेमधील दिग्गज नेते एकवटले आहेत. लोकसभेप्रमाणेच मनीपॉवरचा फंडा आगामी विधानसभेला वापरण्याचा डाव जयंत पाटील यांच्या विरोधकांकडून सुरू आहे. त्यामुळे जयंत पाटील समर्थकांना आत्तापासूनच सावध भूमिका घ्यावी लागणार आहे.

प्रतीक पाटील यांच्यापुढे विरोधकांचे आव्हान..दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभेसाठी जयंत पाटील समर्थकांत सध्यातरी हालचाली नाहीत. परंतु, स्वत: जयंत पाटील बुथ कमिट्या सक्षम करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या अपरोक्ष मतदारसंघाची जबाबदारी चिरंजीव प्रतीक पाटील सांभाळत आहेत. राजारामबापू पाटील उद्योग समुहात युवकांना संधी देण्याचे प्रयत्न झाले. सध्या पाटील यांनी शरद पवार यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी राज्यात संपर्क वाढवला आहे. त्यामुळेच इस्लामपूर मतदारसंघात प्रतीक पाटील तळ ठोकून आहेत. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी जयंत पाटील यांना मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठी महायुतीतून उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे.

राज्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढत आहे. इस्लामपूर मतदारसंघातील आमचे नेते आमदार जयंत पाटील यांची ताकद अबाधित आहे. विधानसभेला त्यांच्या अपरोक्ष त्यांचे समर्थक एकदिलाने प्रचार यंत्रणा राबवतील. जिल्ह्यातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. - देवराज पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरvidhan sabhaविधानसभाJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपा