पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत:च्या कारखान्यासाठी गोळा केलेला पैसा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:27 IST2021-04-22T04:27:14+5:302021-04-22T04:27:14+5:30

नेर्ले : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत:चा कारखाना काढण्यासाठी पैसे गोळा केले. आता ते पैसे गायब असल्याचा आरोप ...

The money collected by Prithviraj Chavan for his own factory is missing | पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत:च्या कारखान्यासाठी गोळा केलेला पैसा गायब

पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत:च्या कारखान्यासाठी गोळा केलेला पैसा गायब

नेर्ले : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत:चा कारखाना काढण्यासाठी पैसे गोळा केले. आता ते पैसे गायब असल्याचा आरोप कृष्णेचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांनी केला. कृष्णा ही विकासाची बेटे व्हावीत यासाठी आमचा प्रयत्न आहे. अविनाश मोहितेंना अजून पाच वर्षे संधी दिली असती तर येथे ‘कृष्णा’ होता अशी पाटी लावावी लागली असती, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

नेर्ले (ता. वाळवा) येथील शेतकरी जालिंदर माने यांच्या घरी झालेल्या सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते अप्पासाहेब माने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी कृष्णेचे अध्यक्ष डॉ. सुरेश भाेसले, पै. आनंदराव मोहिते, संचालक धोंडीराम पाटील, गिरीश पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, कृष्णाजी माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. सुरेश भाेसले म्हणाले, कोरोनाच्या जागतिक महामारीत 'कृष्णा' रुग्णालयाने हजारो लोकांचे जीव वाचविले. हजारो लोक वर्षानुवर्षे उपचार घेताहेत. ज्यांना स्वत:चा दवाखाना चालवता येत नाही. जे त्यांनी निर्माण केलं ते बंद पडतंय. त्यांचा हातगुणच तसा आहे. यशवंतराव मोहिते पतसंस्थेने लोकांचे ४० कोटी बुडविले, असा आरोप डॉ.सुरेश भाेसले यांनी डॉ. इंद्रजित मोहिते यांचे नाव न घेता केला. यावेळी मोहिते गटातून माजी उपसरपंच प्रकाश माने व जालिंदर माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहकार पॅनलमध्ये प्रवेश केला.

डॉ. भाेसले म्हणाले, अविनाश मोहिते यांनी ज्यादा कामगार घेतले. ज्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढले ते सातशे लोक आहेत. वाहतूकदारांच्या नावावर कर्ज काढले. सरासरी तीन हजारच्या वर दर आम्ही दिला. साखरेला मागणी नाही म्हणून इथेनॉल निर्माण केलं. एक लाख पोती साखर कमी केली. दर महिन्याला पन्नास लाख रुपये लेबरला दिले. ३ वर्षात २३ कोटी रुपये कुणाला दिले याचा हिशेब नाही. ज्येष्ठ नेते अप्पासाहेब माने यांनी आभार मानले.

Web Title: The money collected by Prithviraj Chavan for his own factory is missing