युवतीचा विनयभंग; कर्नाटकातील तरुणावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:02+5:302021-03-17T04:28:02+5:30

सांगली : शहर परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून सोशल मीडियावर तिचा फोटो टाकल्याप्रकरणी तरुणावर विनयभंग आणि बाललैंगिक ...

Molestation of a young woman; A case has been registered against a youth from Karnataka | युवतीचा विनयभंग; कर्नाटकातील तरुणावर गुन्हा दाखल

युवतीचा विनयभंग; कर्नाटकातील तरुणावर गुन्हा दाखल

सांगली : शहर परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून सोशल मीडियावर तिचा फोटो टाकल्याप्रकरणी तरुणावर विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर नाईक (२५, रा. नेवनाळ, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी कुटुंबीयांसह परिसरात राहते. ही मुलगी घरी एकटी असताना संशयित सुधाकर नाईक तिच्या घरी येऊन तुझ्यावर माझे प्रेम आहे, तू मला आवडतेस असे म्हणून हात धरून तिचा विनयभंग केला. फिर्यादीच्या मुलाच्या नावाने बनावट खाते तयार करून सोशल मीडियावर मुलीचा फोटो अपलोड केला आहे. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरून गेली. तिने ही घटना घरी सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार संशयितावर गुन्हा दाखल केला.

Web Title: Molestation of a young woman; A case has been registered against a youth from Karnataka