अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST2021-07-23T04:17:05+5:302021-07-23T04:17:05+5:30

शिराळा : शिराळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी भारत मोतीराम हुबळीकर (वय ४०, ...

Molestation of a minor girl; One arrested | अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास अटक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास अटक

शिराळा : शिराळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी भारत मोतीराम हुबळीकर (वय ४०, रा. सागाव) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पीडित मुलीचे आई-वडील दि. २० जुलै रोजी औषधांसाठी बाहेरगावी गेले होते. या दरम्यान भारत हा मुलीच्या घरी आला. त्याने पीडित मुलीला आम्ही दिलेले वासरू दाखव असे सांगत, तिला गोड बोलून गोठ्यात घेऊन गेला. गोठ्यात गेल्यावर त्याने या मुलीचा विनयभंग केला. ही गोष्ट कोणालाही सांगू नये अशी तिला धमकीही दिली. दुपारी पीडित मुलीचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना ही घटना समजली. मुलीच्या आई-वडिलांनी तत्काळ शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करून भारत यास अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश वाडेकर करीत आहेत.

Web Title: Molestation of a minor girl; One arrested