शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: दागिने विकायला आला, पोलिसांच्या जाळ्यात अडकला; पावणे सात लाखाचे दागिने जप्त

By शीतल पाटील | Updated: November 13, 2023 17:55 IST

दिवसा, रात्री करायचा घरफोडी

सांगली : मोहोळ (जि. सोलापूर) येथील रेकाॅर्डवरील गुन्हेगार यल्लाप्पा उर्फ खल्या आदरक शिंदे (वय ४२) हा सोन्याचांदीचे दागिने विकण्यासाठी आला असता सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून सहा लाख ७३ हजार रुपये किंमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. सांगलीसह सोलापूर जिल्ह्यात दिवसा व रात्री घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली आहे.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घरफोडीतील गुन्हेगारांच्या शोधासाठी सहाय्यक निरीक्षक सिंकदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त केले होते. या पथकातील काॅन्स्टेबल राजू शिरोळकर यांना यल्लापा शिंदे हा चोरीतील दागिने विक्रीसाठी मिरज सिव्हिल रुग्णालय परिसरातील बसवेश्वर उद्यानाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने मिरज सिव्हिल रुग्णालय परिसरात सापळा लावला. यल्लाप्पा हा पिशवी घेऊन उद्यानासमोर उभा असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पिशवीत सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले. पोलिसांनी दागिन्याबाबत विचारणा करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. पथकाने त्याच्याकडून ६ लाख किंमतीचे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ७३ हजार रुपये किंमतीचे एक किलो चांदीचे दागिने असा ६ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला मिरज ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस