ऐतवडे बुद्रुक सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहन सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:44+5:302020-12-11T04:53:44+5:30

ऐतवडे बुद्रुक : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील ऐतवडे बुद्रुक क्र. १ सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहन सावंत यांची, तर उपाध्यक्षपदी ...

Mohan Sawant as the President of Aitwade Budruk Society | ऐतवडे बुद्रुक सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहन सावंत

ऐतवडे बुद्रुक सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहन सावंत

ऐतवडे बुद्रुक : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील ऐतवडे बुद्रुक क्र. १ सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहन सावंत यांची, तर उपाध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सोसायटीचे ऐतवडे बुद्रुक, ढगेवाडी व जक्राईवाडी कार्यक्षेत्र आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत या सोसायटीच्या अध्यक्षपदी ढगेवाडीचे सावंत व उपाध्यक्षपदी ऐतवडे बुद्रुकचे शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. पाटील, मावळते अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष शामराव गायकवाड, जक्राईवाडीचे सरपंच दिग्विजय माने, ढगेवाडीचे संदीप सावंत, शशिकांत शेटे, शिवाजी फसाले, सचिव विकास माने, परशुराम माळी, दत्तात्रय चेंडके व सर्व संचालक आदी उपस्थित होते.

फोटो - १०१२२०२०आयएसएलएम-ऐतवडे बुद्रुक न्यूज : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील सोसायटी क्र. १ चे अध्यक्ष मोहन सावंत व उपाध्यक्ष शिवाजी शिंदे यांचा सत्कार शहाजी गायकवाड, संदीप सावंत यांनी केला.

Web Title: Mohan Sawant as the President of Aitwade Budruk Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.